‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’चे उत्पादन घटण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने संरक्षण सेवांवर केंद्रित आहे. कोरोना साथीमुळे मागणीवर दीर्घकाळासाठी मोठा परिणाम झाला आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने संरक्षण करारांमध्ये दीर्घकालीन गरजांचे प्रतिबिंब उमटलेले असते. - आर. माधवन, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्थान एरोनॉटिक्स

बंगळूर: हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल) या विमान निर्मिती व संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनीने अल्प कालावधीसाठी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. कोरोना साथीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कंपनीने हा अंदाज वर्तविला आहे. 

आर्थिक मंदीबरोबरच संरक्षण अर्थसंकल्पात कपात केल्यामुळेही खेळत्या भांडवलावर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’मुळे कंपनीच्या कार्याला चालना मिळण्याची ‘एचएएल’ची अपेक्षा आहे.  कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन म्हणाले,‘‘ एचएएल प्रामुख्याने तंत्रज्ञान केंद्रित कंपनी असून तंत्रज्ञान हस्तांतरण, प्रणाली, उपप्रणाली व परदेशी कच्च्या वस्तूंना स्वदेशी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. जगभरात लॉकडाउन झाल्याने पुरवठादार रोख रक्कमेचा प्रवाह, तरलतेच्यचा समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून ‘एचएएल’च्या उत्पादनावर अल्प काळासाठी परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीही कंपनी या परिस्थितीवर मात करेल.’’ कंपनीच्या अहवालात माधवन यांनी हा उल्लेख केला आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या