इंजिन बनवताना झालेल्या एका चुकीमूळे होंडा ने परत बोलावल्या 78 हजार कार

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

गाडीच्या फ्युएल पंपमध्ये आलेल्या खराबीमुळे जपानची वाहन निर्माता कंपनी होंडा ने भारतातून तब्बल 78000 कार वापस घेऊन जाणार असल्याची माहिती दिली आहे.

गाडीच्या फ्युएल पंपमध्ये आलेल्या खराबीमुळे जपानची वाहन निर्माता कंपनी होंडा ने भारतातून तब्बल 78000 कार वापस घेऊन जाणार असल्याची माहिती दिली आहे. खराब असलेला फ्युएल पंप बदलण्यासाठी कंपनीने या गाड्या वापस बोलावल्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. होंडा कंपनीने 2019 ते 2020 दरम्यान तयार केलेल्या वेगेवगेळ्या प्रकारच्या गाड्यांमध्ये फ्युएल पंप मध्ये खराबी असून त्यामुळे येणाऱ्या काळात या वाहनांना इंजिन सुरु करण्यात अडचण येऊ शकते म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. (Honda recalled 78,000 cars due to a mistake made while building the engine)
 
कंपनीने  घेतलेल्या या निर्णयानंतर एप्रिल मध्ये या वाहनांना परत घेऊन जाण्याचे काम टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. कंपनीने वापस बोलावलेल्या गाड्यांचे प्रकार आणि प्रमाण यांची यादी जाहीर केली असल्याचे समजते आहे. त्यानुसार  36086 होंडा अमेज(Honda Amaze), 20248 होंडा सिटी(Honda City), 7871 होंडा डब्ल्यूआर-व्ही(Honda WR-V), 6235 जेजे प्रीमियम हॅचबॅक, 5170 होंडा सिव्हिक, 1737 बीआर-व्ही या कार कंपनी परत घेऊन जाणार असल्याचे समजते आहे. यादीमध्ये समावेश असलेल्या या सर्व गाड्या जानेवारी ते ऑक्टोबर 2019 दरम्यान तयार झाल्या असल्याचे समजते आहे. 

पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुक्ल कधी कमी होणार? CBIC च्या अध्यक्षांनी दिले...

मार्च महिन्यात गाड्या परत बोलावण्याचा हा निर्णय कंपनीने घेतला त्यावेळी, जगभरातुन 761000 गाड्यांचे फ्युएल पाईप बदलणार असल्याचे कंपनीकडुन सांगण्यात आले होते. जेणेकरुन भविष्यात या वाहनांचे इंजिन सुरु करण्यात अडथळा येणार नाही. 
 

संबंधित बातम्या