घरबसल्या तुमच्या वाहनावरील ई-चलन चेक करा आणि ऑनलाईनच भरा

घरबसल्या तुमच्या वाहनावरील ई-चलन चेक करा आणि ऑनलाईनच भरा
e challan.jpg

ऑनलाइनच्या जमान्यात वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा देखील अत्यंत अत्याधुनिक झाले असल्याचे पाहायला मिळते आहे. सिग्नल तोडले, हेल्मेट शिवाय दुचाकी चालवली, रॉंग साईट दुचाकी चालवली किंवा इतर कुठलेही वाहतुकीचे नियम आपण तोडले तर आधी पोलीस आपल्याला थांबवून दंड वसूल करायचे, यातून काही लोक पाळण्याचे मार्ग सुद्धा शोधायचे मात्र आता ऑनलाईन ई-चलन मुले अशा अनेक पळवाटा बंद झाल्या आहेत. (How to check e challan online)

कुठलाही वाहतूक नियम तोडल्यास आता थेट तुमच्या दुचाकी क्रमांकाच्या आधारे तुमच्या गाडीवर दंड/इ-चलन लावला जातो. याची अनेकदा आपल्याला माहिती देखील होत नाही, किंवा धावपळीत या गोष्टी आपण विसरून जातो. मात्र अनेकदा दंड लागल्याने दंडाची रक्कम वाढत जाते आणि याचा तुमच्या खिशाला एकदाच फटका बसतो, म्हणूनच तुमच्या वाहनावर (Vehicle) असलेला दंड तुम्ही आजच जाणून घ्या. त्यासाठी खाली दिलेल्या माहिती नुसार तुम्ही तो दंड जाणून घेऊ शकता तसेच तो इ-चलन (E Challan) घरबसल्या भरू सुद्धा शकता.  

इ-चलन जाणून घेण्यासाठी काय कराल?

- ऑनलाईन चलन तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट               echallan.parivahan.gov.in वर जावे लागेल.
- येथे तुम्हाला "चेक चलन स्टेटसचा" पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि डीएल क्रमांक तीन पर्याय दिले जातील.
- येथे तुम्हाला वाहन क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल.
- आता तुमचा वाहन क्रमांक टाकल्यानंतर तर तुम्हाला चेसिस किंवा इंजिन क्रमांक द्यावा लागेल.
- खाली दिलेला "कॅप्चा" एंटर करा आणि "गेट डिटेल्स" वर क्लिक करा.
- जर तुमच्या वाहनावर ई-चलन अर्थात दंड आकारला गेला असेल तर त्याचा तपशील समोर येईल.


ऑनलाईन ई-चलन कसे भराल?

- जर आपल्या चलनाचा तपशील आला असेल तर आपण त्वरित ऑनलाईन पैसे भरू शकता.
- यासाठी तुम्हाला चलनासह देण्यात आलेल्या "पे नाऊ"च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, आपल्या खात्याशी जोडलेला फोन नंबर विचारला जाईल.
- नंबर दिल्यानंतर "गेट ओटीपी" वर क्लिक करा.
- ओटीपी प्रविष्ट करुन आपला मोबाइल नंबर व्हेरिफाय करा.
- आता ई-चालान पेमेंटची वेबसाइट उघडेल, "नेक्स्ट" येथे क्लिक करा.
- आता आपणास "पेमेंट कन्फर्मेशनसाठी" विचारले जाईल, तेव्हा प्रोसीड वर  क्लिक करा.
- आता आपल्याला ऑनलाइन (Online) पैसे भरण्याचे वेगवेगळे पर्याय मिळतील.
- एक पद्धत निवडा आणि आपल्या सोयीनुसार पैसे भरा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com