PM SVANidhi: कोणत्याही बँक हमीशिवाय सरकार देतंय कर्ज, असा करा अर्ज

तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर नंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत दुप्पट रकमेचे कर्ज मिळेल.
PM SVANidhi
PM SVANidhiDainik Gomantak

PM SVANidhi: कोरोनाच्या काळात अनेक छोटे दुकानदार आणि पथारी व्यावसायिकांचे काम ठप्प झाले. आर्थिक स्थिती कमजोर झालेल्या अशा नागरिकांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. केंद्राच्या या आर्थिक मदतीच्या सहाय्याने लोकांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होऊ शकते. विशेष मोदी सरकारकडून मिळणारे हे कर्ज कोणत्याही बँक हमीशिवाय मिळत आहे. चला तर मग काय आहे पीएम स्वनिधी योजना (PM SVANidhi yojana) जाणून घेऊयात.

काय आहे पीएम स्वनिधी योजना ? (What is PM SVANidhi)

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कोणतीही हमी न देता दहा हजार रुपयांचे कर्ज मिळते. विशेषतः फेरीवाल्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. फेरीवाल्यांना कोरोनाच्या काळात मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांना पुन्हा काम सुरू करण्यासाठी या योजनेद्वारे मदत केली जाते. सरकार या कर्जावर सबसिडी देखील देते. जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर नंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत दुप्पट रकमेचे कर्ज मिळेल. म्हणजेच कोणत्याही हमीशिवाय तुम्ही आणखी कर्ज घेऊ शकता.

PM SVANidhi
Post Office Scheme: पोस्टाने आणली तुमच्या फायद्याची स्कीम, जाणून घ्या

कसे मिळवायचे योजनेचे पैसे ?

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल. यामध्ये पहिल्यांदा दहा हजार रुपये कोणत्याही हमीशिवाय मिळणार आहेत. पहिल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यानंतर, दुसऱ्यांदा तुम्ही कोणत्याही हमीशिवाय दुप्पट म्हणजेच वीस हजार रुपये घेऊ शकता. हे व्याज वेळेवर भरल्यानंतर, तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय तिसऱ्यांदा पन्नास हजारांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला असा फायदा देखील मिळेल की तुम्ही वेळेवर पैसे भरल्यास आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिल्यास तुम्हाला कॅशबॅक देखील मिळेल.

कसा करायचा अर्ज? (How to apply for PM SVANidhi)

पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम तुम्हाला सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.

तुम्हाला बँकेकडून अर्ज मिळेल. पीएम स्वानिधी योजनेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो आधार कार्डच्या फोटोकॉपीसह बँकेतच जमा करावा लागेल.

सर्व माहिती तपासून बँक कर्जाला मान्यता देईल. तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com