कार-बाईकवर झाड पडल्यास किंवा पावसामुळे नुकसान झाल्यास असा करा विमा क्लेम

तुमची बाईक पाण्यात वाहून गेली असेल तर तुमचे नुकसान या विम्याद्वारे भरून निघेल
Car/ Bike Insurance
Car/ Bike InsuranceDainik Gomantak

दिल्ली-एनसीआरमध्ये या आठवड्यात वादळ आणि मुसळधार पावसामुळे हवामानात सुधारणा झाली आहे. परंतु ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने हजारो लोकांच्या कार आणि बाईकचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कंपनी तुमची कार किंवा बाइकचे नुकसान भरून काढते का? जाणून घ्या संपूर्ण नियम ... (Car/ Bike Insurance)

जर तुमचा मोटर व्हेईकल इन्शुरन्स (कार/बाईक इन्शुरन्स) 'कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्शुरन्स' असेल, तर तुम्हाला सर्व प्रकारच्या नुकसान भरून काढण्यासाठी विमा क्लेम मिळेल. या विम्यामध्ये वादळ, पाऊस, पूर, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठीही विमा संरक्षण उपलब्ध आहे. आता पावसात झाड पडले असेल किंवा कार/बाईक पाण्यात वाहून गेली असेल तर तुमचे नुकसान या विम्याद्वारे भरून निघून जाईल.

याशिवाय वाहन चोरीला गेल्यास कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्शुरन्समध्ये कवर उपलब्ध आहे. तसेच, जर तुमच्या चुकीमुळे वाहनाचे नुकसान झाले असेल, तर पॉलिसी कव्हर देखील देते. म्हणजेच या विम्यामध्ये वाहन चोरी, आगीमुळे होणारे नुकसान, पुराचे पाणी, भूकंप, भूस्खलन, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचे कवर उपलब्ध आहे. यामध्ये एखाद्या प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही दिली जाते.

Car/ Bike Insurance
Life Insurance Council : कुटुंबाला सर्वात मौल्यवान भेट द्या....

पार्किंगमध्ये पाणी भरले तरी क्लेम करता येईल का?

काही वेळा पावसाळ्यात तळघरातील पार्किंगमध्ये पाणी तुंबते आणि त्यामुळे वाहनाचे इंजिन गोठले जाते, त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वसमावेशक मोटार विमा अंतर्गत क्लेम उपलब्ध आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. नैसर्गिक आपत्तीमुळे इंजिन बंद होण्याच्या स्थितीला हायड्रोस्टॅटिक लॉक म्हणतात. अशा प्रकरणांमध्ये, कंपन्या दावा देत नाहीत कारण हा अपघात मानला जात नाही. मात्र, अशा परिस्थितीत, क्लेम मिळविण्यासाठी वाहन मालक इंजिन संरक्षक कवर खरेदी करू शकतो. जर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्ससोबत इंजिन प्रोटेक्टर कवर घेतले असेल, तर या परिस्थितीत तुम्हाला क्लेम मिळेल.

Car/ Bike Insurance
Increase In Insurance Premium: कार आणि बाईकच्या हप्तामध्ये 20 टक्क्यांनी वाढ

विमा संरक्षणाचा दावा कसा करावा?

जर तुमच्या कार किंवा बाईकवर झाड पडले असेल किंवा पावसामुळे इतर कोणतेही नुकसान झाले असेल, तर तुम्ही विम्याचा दावा करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करू शकता...

1. सर्वप्रथम, तुमच्या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर क्लेम रजिस्टर करा. तुमचा पॉलिसी क्रमांक तुमच्याकडे ठेवा जेणेकरून टेलिकॉलरशी संवाद साधणे सोपे होईल.

2. तुम्ही तुमच्या कारची नोंदणी जवळपासच्या कोणत्याही मेकॅनिकच्या दुकानातून करू शकता. या संदर्भात, तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या कस्टमर केअरला तपशील विचारू शकता.

3. विमा क्लेम घेण्यासाठी फॉर्म भरा. सर्व कागदपत्रे एकत्र जमा करा आणि क्लेम फॉर्म सबमिट करा. तुम्हाला विमा कंपनीच्या वेबसाइटवर हा क्लेम फॉर्म मिळेल.

4. तुमचा क्लेम लागू केल्यानंतर, विमा कंपनी तो सर्वेक्षकाकडे पाठवेल. कोविड-19 नंतर काही कंपन्या व्हिडीओ सर्वेक्षणाची सुविधाही देतात. सर्वेक्षक तुम्हाला कार/बाईकची सर्व कागदपत्रे कॉपी करण्यास सांगू शकतात, म्हणून ती तयार ठेवा.

5. कारची तपासणी पूर्ण झाल्यावर तुमचा विमा क्लेम येईल. तुम्ही त्याची वेळोवेळी अपडेट्स घेवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com