कॅनरा आणि सिंडिकेट बँकेत अकाऊंट असेल तर ही बातमी नक्की वाचा  

दैनिक गोमंतक
शनिवार, 22 मे 2021

केंद्र सरकारने (Central Government) अनेक बँकांचे विलीनकरण केले आहे. कोरोना काळात नेट बँकिंगचे ( Net Banking) प्रमाण बरेच वाढले आहे. आयएफएससी कोड (IFSC Code) नेट बँकिंगकारीता अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळेच जर आपण चुकीचा आयएफएससी कोड (IFSC Code) टाकला तर व्यवहार होणार नाही. 

बँकेचे (Bank) व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक असते. जर आपण चुकीचा आयएफएससी (IFSC Code) कोड टाकल्यास व्यवहार होणार नाही. केंद्र सरकारने (Central Government) अनेक बँकांचे विलीनकरण केले आहे. कोरोना काळात नेट बँकिंगचे ( Net Banking) प्रमाण बरेच वाढले आहे. आयएफएससी कोड (IFSC Code) नेट बँकिंगकारीता अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळेच जर आपण चुकीचा आयएफएससी कोड (IFSC Code) टाकला तर व्यवहार होणार नाही. विलीन केलेल्या बँकांचे आयएफएससी कोडमध्ये (IFSC Code) बदल करण्यात आला आहे. अशावेळी नव्या कोडबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. (If you have an account with Canara and Syndicate Bank, then definitely read this news)

या सायबर सिक्युरिटी कंपनीतील कर्मचार्‍यांच्या पगारात 30 ते 40% वाढ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 2019 मध्ये 10 सरकारी बँकांचे विलीनकरण केले होते. आयएफएससी कोडची शेवटची मुदत ही वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळी होती. अलाहाबाद बँकेच्या ग्राहकांसाठी आयएफएससी कोड हा 1 मे पासून बदलला होता. तसेच सिंडिकेट बँकेचे ग्राहक अजूनही त्यांचा जुनाच आयएफएससी कोड वापरत आहे. परंतु 1 जुलैपासून हा कोड वापरल्यास व्यवहार होणार नाही आणि त्यांना व्यवहार करण्यासाठी नव्या कोडची गरज असेल. 2019 मध्ये निर्मला सितारमण यांनी 'ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स' आणि 'युनायटेड बँक ऑफ इंडिया' याचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनकरण केले.

Canara Bank, Narhe Pune - ExcelCity India

चिनी अब्जाधीशांना मागे टाकत अंबानी-अदानी यांचा आशिया खंडावर ताबा

तसेच आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँकेला युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन केले. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. तसेच विजया व देना बँक या बँक ऑफ बडोदा बँकेत विलीन झाल्या. बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे रोजी अलाहाबाद बँकेचा आयएफएससी कोड बंद करण्यात आला.  सिंडिकेट बँके खाते असणारे ग्राहक जुन्या आयएफएससी कोडचा वापर 30 जूनपर्यंत चालू ठेवतील. पण 1 जुलैपासून  आयएफएससी कोडने व्यवहार होणार नाही. अशावेळी जर तुमचे सिंडिकेट बँकेत खाते असेल, तर 30 जूनपर्यंत अद्यायावत करणे गरजेचे आहे. नाहीतर नेट बँकिंग करणे शक्य होणार नाही. 

Syndicate Bank, Camp - Banks in Pune - Justdial

Vi च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

कॅनरा बँकेच्या अधिकृत वेब साईडवरील माहितीनुसार, सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांसाठी आयएफएससी कोडमध्ये 1 जुलै पासून बदल केले जातील. ग्राहकांसाठी आयएफएससी कोड सध्या SYNB पासून सुरू होतो. हा कोड 30 जून पर्यंत अद्यायावत करण्यासचा सल्ला दिला आहे. नव्या आयएफएससी कोडबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कॅनरा बँकेच्या अधिकृत वेब साईडवर जावे. या वेब साईडवर सर्व माहिती उपलब्ध आहे. 

 

संबंधित बातम्या