Income Tax: करदात्यांना धक्का! या बँकांचे ग्राहक ऑनलाइन Tax भरु शकणार नाहीत

Netbanking Tax Payment: जर तुम्ही ऑनलाइन इन्कम टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महबत्त्वाची आहे.
Income Tax
Income Tax Dainik Gomantak

ITR Filing: जर तुम्ही ऑनलाइन इन्कम टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महबत्त्वाची आहे. कर भरण्यापूर्वी, तुमचे बॅंक टॅक्स पेमेंट फॅसिलिटी रुटशी जोडलेले आहे की नाही हे जाणून घ्या. वास्तविक, आयकर ई-फायलिंग पोर्टलने ई-पे टॅक्सची सेवा सुरु केली आहे.

अनेक बँका नवीन आयकर पोर्टलवर स्थलांतरित झाल्या

ई-फायलिंग आयकर पोर्टलवर कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. CBDT ( Central Board of Direct Taxes) नुसार, अनेक बँकांनी OLTAS ई-पेमेंट कर प्रणालीवरुन TIN NSDL वेबसाइटवर स्विच केले आहे. नवीन डायरेक्‍ट टॅक्‍स (Tax) पेमेंट स‍िस्‍टमला CPC 2.0 - TIN 2.0 असे नाव देण्यात आले आहे. इथे आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगत आहोत, ज्या नवीन आयकर पोर्टलवर मायग्रेट झाल्या आहेत. परंतु आयकर भरण्यासाठी या बँका NSDL पोर्टलवर उपलब्ध नाहीत.

Income Tax
Income Tax Return: करदात्यांना दिलासा, ITR फाइलिंगच्या नियमात लवकरच मोठे बदल

या बँका नवीन आयकर पोर्टलवर स्थलांतरित झालेल्या नाहीत

या बँकांमध्ये अ‍ॅक्सिस बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक (ICICI Bank), इंडियन बँक, करुर वैश्य बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे.

Income Tax
Income Tax Rule: आयकर विभागाने केला हा मोठा बदल, जाणून घ्या नाहीतर पडेल महागात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन टॅक्स पोर्टलवर मायग्रेट झालेल्या बँकांच्या ग्राहकांना (Customers) संबंधित बँकेने सूचित केले आहे. आयसीआयसीआय बँकेने खातेदारांना पाठवलेल्या संदेशात असे लिहिले आहे की, आयकर विभागाने आयसीआयसीआय बँकेला डायरेक्ट टॅक्स पेमेंट करण्यासाठी नवीन कर टॅक्स इनफॉर्मेशन वर्जन 2.0 मध्ये मायग्रेट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com