डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण होताच सोन्याच्या दरात वाढ

hike in gold prices after trump got positive with corona virus
hike in gold prices after trump got positive with corona virus

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे वृत्त जगभर पसरताच याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याचे वृत्त आल्यावर अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात पडझड सुरू झाली. त्याबरोबर कच्च्या तेलाचे दरही कोसळले. अशात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे.
जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत 0.4 टक्क्यांची वाढ झाली असून दर 1913.90 डॉलरवर पोहोचला. तर चांदीच्या किंमतीत 0.9 टक्क्यांची तेजी आली. जागतिक बाजारपेठेत चांदीची किंमत वाढून 23.9992 डॉलर प्रति औंसवर पोहोचली.  
ऑगस्ट महिन्यात एमसीएक्सवर मिळणारे सोने आपल्या आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. त्यावेळी सोन्याचा दर 56 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सोन्याचा दर असाच वाढता राहणार होता. सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 60 हजाराला स्पर्श करेल, असा त्यांचा कयास होता. परंतु, सध्या हा दर 50 हजारापर्यंत खाली आला आहे. त्यावेळी चांदीही 78 हजारापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर हा दर आता 60 हजारापर्यंत आला आहे. कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात सोने आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा वायदा गुरुवारी 0.4 टक्क्यांनी वाढून 50544 वर पोहोचला होता. तर चांदीची किंमत तेजीसह 60900 प्रति किलोग्रॅमवर पोहोचला होता. भारतात शुक्रवारी सोन्याचा दर 53670 रुपये प्रती  10 ग्रॅमवर पोहोचला. तर चांदीची किंमत 60700 रुपये प्रती किलोग्रॅमवर पोहोचली. 
आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारे सोने आणि चांदीच्या किंमतीवर सध्या दबाव दिसत आहे. सायंकाळी 5.45 वाजता 20 डिसेंबरला मिळणाऱ्या चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 0.33 टक्के घसरणीसह 24.17 डॉलर प्रती औंसवर आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या 20 डिसेंबरला मिळणाऱ्या सोन्याच्या दरात 0.006 टक्के घसरणीसह 1914.16 डॉलर प्रती औंस ट्रेड करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com