Increase In Insurance Premium: कार आणि बाईकच्या हप्तामध्ये 20 टक्क्यांनी वाढ

मोटार विम्याचे प्रीमियम 15 ते 20 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. गेल्या दोन वर्षांपासून मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असा युक्तिवाद सामान्य विमा कंपन्यांनी केला आहे.
Increase In Insurance Premium
Increase In Insurance PremiumDainik Gomantak

जीवन विमा आणि स्वास्थ्य विमा महागल्यानंतर आता कार आणि बाईकचा विमा महागणार आहे. देशातील सामान्य विमा कंपन्यांनी एकत्रितपणे विमा नियामक IRDA कडे मोटर विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. मोटार विम्याचे प्रीमियम 15 ते 20 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. गेल्या दोन वर्षांपासून मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असा युक्तिवाद सामान्य विमा कंपन्यांनी केला आहे.

Increase In Insurance Premium
मोदी सरकारमध्ये आलेल्या या 10 मोठ्या स्टार्टअपने गाठला यशाचा एक नवा पल्ला

2020 मध्ये थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम वाढणार होता, परंतु कोविड-19 (Covid-19) मुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता विमा कंपन्यांचे (Insurance Company) म्हणणे आहे, की थर्ड पार्टी इन्शुरन्सशी संबंधित दावे सातत्याने वाढत आहेत. या काळात कोरोना महामारीमुळे (Corona) वाहनांची विक्रीही कमी झाली आहे.

त्यामुळे वाहन विमा उद्योगाचा व्यवसाय वाढीऐवजी 2 टक्क्यांनी घसरला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मोटार विम्यात सुमारे 4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असली, तरी ती कोविड-19 पूर्वीच्या पातळीपेक्षा 5 टक्के कमी आहे. यामुळे विमा कंपन्यांवर प्रीमियम वाढवण्यासाठी दबाव येतो आहे.

Increase In Insurance Premium
ओमिक्रॉनचा कहर, पेट्रोल अन् डिझेलचा वापर झाला कमी मात्र...

आम्ही तुम्हाला सांगतो की सर्व खाजगी कंपन्यांनी जीवन विमा प्रीमियमचे कंपन्यांनी दर 40 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. जीवन विम्याच्या क्षेत्रातील जवळपास प्रत्येक कंपनीने कोरोनाच्या काळात प्रीमियम महाग केले आहेत. काही कमी तर काही जास्त. LIC ही एकमेव कंपनी आहे जिने टेक टर्म प्लॅनमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.

कोविड दरम्यान दाव्यांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर विमा कंपन्यांनी पॉलिसीच्या अटी कडक केल्या आहेत आणि प्रीमियम वाढवला आहे. विमा कंपन्यांचा दावा आहे की जगाच्या तुलनेत भारतात मुदतीच्या योजनांचे दर अजूनही खूप कमी आहेत. मुदतीच्या योजनांमध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या/तिच्या नॉमिनीला मोठी रक्कम दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com