ITR भरण्याच्या तारखेत वाढ, व्याज मात्र भरावेच लागणार
Income Tax Return- ITR भरण्याची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे. Dainik Gomantak

ITR भरण्याच्या तारखेत वाढ, व्याज मात्र भरावेच लागणार

रिटर्न (ITR) भरताना काही कर (Tax) भरायचा असल्यास, तो व्याजासह स्व-मूल्यांकन कर सोबत जमा करावा लागेल. हे व्याज 1 टक्के दराने आकारले जाईल.

आयकर विवरणपत्र (Income Tax Return- ITR) भरण्याची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) नवीन वेबसाईटमध्ये येणाऱ्या अडचणी त्यामुळे रिटर्न भरण्यास लागणारा वेळ पाहता सरकारने ऑडिट नॉन-ऑडिट रिटर्न भरण्याची तारीख आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत विवरणपत्र भरण्यासाठी आता 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार नाही. दंड टाळणार असला तरी यावर लागणारे व्याज (Interest) भरावेच लागणार आहे. तुम्ही कर दाते असल्यास, व्याज टाळण्यासाठी आत्ताच कर भरणे फायदेशीर ठरेल.

Income Tax Return- ITR भरण्याची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे.
TAX Collection: केंद्र सरकारचे यंदा 22.2 लाख कोटींचे लक्ष

आयकर नियमांनुसार, सर्व लोकांना शेवटच्या तारखेनंतर आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागत नाही. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर आयटीआरच्या शेवटच्या तारखेनंतरही रिटर्न भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. त्याची तरतूद कलम 234 एफ मध्ये करण्यात आली आहे. येथे एकूण उत्पन्नाचा अर्थ म्हणजे, कलम 80 सी आणि 80 यू अंतर्गत कर सूट न घेता जे उत्पन्न मिळते, त्याला एकूण उत्पन्न असे म्हणतात.

कोणाला व्याज भरावे लागते

आयकर विभागाच्या गणनेनंतर जो कर भरावा लागतो. त्याच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम आगाऊ कर किंवा टीडीएस म्हणून जमा केल्यास उर्वरित रकमेवर 1 एप्रिल 2021 पासून 1 टक्के दराने व्याज देण्याची तरतूद आहे. रिटर्न भरताना काही कर भरायचा असल्यास, तो व्याजासह स्व-मूल्यांकन कर सोबत जमा करावा लागेल. हे व्याज 1 टक्के दराने आकारले जाईल.

Income Tax Return- ITR भरण्याची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे.
Income Tax: वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना HRA वर आता दावा करता येईल

वेबसाईटमधील त्रुटीमुळे आयटीआर भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. परंतु करदात्यांनी व्याज भरल्याने त्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांचे सेल्फ-असेसमेंट कर दायित्व 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, तर त्यांना व्याज भरावे लागणार नाही.

जर एखाद्या व्यक्तीचे कर दायित्व 10 हजार रुपये किंवा अधिक असेल तर त्याला आगाऊ कर भरावा लागेल. जे करदाते आगाऊ कर भरत नाहीत, परंतु त्यांचे स्वयं-मूल्यांकन कर दायित्व 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना 31 जुलै किंवा 31 ऑक्टोबरपासून 1 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.

रिटर्न फाईल करा

जर तुम्ही अजून तुमचा ITR दाखल केला नसेल तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, उच्च व्याज दर टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर रिटर्न फाईल करा.

Related Stories

No stories found.