देशाची अर्थव्यवस्था रुळावर येतेय; वीजमागणीत विक्रमी वाढ

देशाची अर्थव्यवस्था रुळावर येतेय; वीजमागणीत विक्रमी वाढ
India recorded The peak demand for power crossed 185820 megawatt

नवी दिल्ली : देशातील वीजेची मागणी बुधवारी विक्रमी 1 लाख 85 हजार 820 मेगावॅटवर पोहोचली. वीजेची वाढती मागणी ही भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे निदर्शक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांनी केलं.

जानेवारीमध्ये आत्तापर्यंत गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत वीजेची मागणी आठ टक्क्यांनी वाढली आहे. वीजेच्या वाढत्या मागणीतून केंद्र सरकारच्या गरिबांना वीज पुरविण्याच्या ‘सुभाग्य’ योजनेला यश आल्याचंही दिसत असल्याचं ट्विट ऊर्जामंत्र्यांनी केलं.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com