Indian Economy: भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती होणार, अर्थमंत्री सितारमन यांचे देशासाठी मोठे स्वप्न

भारतीय अर्थव्यवस्था येत्या 10 ते 15 वर्षांत जगातील तीन प्रमुख आर्थिक शक्तींपैकी एक असेल - निर्मला सीतारामन
Indian economy  Nirmala Sitharaman
Indian economy Nirmala SitharamanDainik Gomantak

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलिकडे 'इंडिया-यूएस बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज' या कार्यक्रमात हजेरी लावली. जागतिक आर्थिक दृष्टीकोन आव्हानात्मक आहे. जागतिक आर्थिक घडामोडींमुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. पण, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतीय अर्थव्यवस्था येत्या 10 ते 15 वर्षांत जगातील तीन प्रमुख आर्थिक शक्तींपैकी एक असेल. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

Indian economy  Nirmala Sitharaman
Tejasvi Surya: खासदार सूर्या यांची 'तेजस्वी' कामगिरी; पूर्ण केली आव्हानात्मक 'आर्यमॅन' स्पर्धा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "नैऋत्य मान्सूनच्या काळात झालेला सरासरीपेक्षा जास्त पाऊस, सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक, मजबूत कॉर्पोरेट क्षेत्र, ग्राहकांचा आत्मविश्वास, उत्तम व्यावसायिक उपक्रम आणि कोविड महामारीचा कमी झालेला प्रभाव यामुळे भारत विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. नुकतेच यूकेला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून, पुढील 10-15 भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती होईल."

Indian economy  Nirmala Sitharaman
Punjab: पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय, गाण्यात यापुढे दाखवता येणार नाही 'गन'

उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक भारतात येत आहे. कारण अनेक कंपन्या चीन-प्लस-वन धोरणाच्या पलीकडे पाहत आहेत. अनेक कंपन्या चीनमधील गुंतवणूक कमी करून पर्यायी भागीदार शोधत आहेत आणि त्यासाठी भारत अनुकूल भागीदार म्हणून पुढे येत आहे. असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. डिजिटल सेवांचे कौतुक करताना सितारमन यांनी डिजिटल मोडद्वारे सार्वजनिक सेवा यासाठी एक मजबूत व्यासपीठ यामुळे भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक बनला आहे. सरकार या दिशेने सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com