भारत लवकरच '5G' युगात करणार प्रवेश

भारत लवकरच '5G' युगात करणार प्रवेश
India will soon enter the 5G era

भारत आता 5G नेटवर्क सुविधेचा लवकरच अवलंब करणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आता भारतात 5G नेटवर्कच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. या चाचण्यांमध्ये रिलायन्स (Reliance), जिओ, भारती एअरटेल तसेच व्हिआय या कंपन्या सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. या चाचण्या कधीपर्यंत चालतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. या चाचण्यांसाठी कोणत्याही चायनिज कंपन्यांना परवानगी देण्यात आलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे. (India will soon enter the 5G era)

गेल्या काही महिन्यांपासून भारतातल्या 5 G सेवेसंदर्भात हालचाली सुरु होत्या. मात्र 5G चाचण्या घेण्यासंदर्भातल्या परवानगीची प्रतिक्षा कंपन्य़ाना लागून राहीली होती. रिलायन्स जिओने याआगोदर आपण स्वदेशी 5G  नेटवर्क उभारणार असल्याबद्दल पुष्टी केली होती. त्याचबरोबर स्वत:ची 5G उपकरण बनवण्यावरही काम सुरु करण्यात आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संपूर्णपणे भारतामध्ये विकसित झालेलं जिओचं 5G नेटवर्क हा मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणांचा भाग आहे. भारतातलं 5G नेटवर्क हे 1800, 2100, 2300, 800, 900 मेगाहर्टझ पट्ट्यांवर काम करणार आहे. हे वारंवारितेच्या पट्टे सर्व्हीस प्रोव्हाडरनुसार बदलू शकतात. सध्या 34 देशातील 378 शहरांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध आहे. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com