भारतीय काळी मिरीच्या दरात चार वर्षांनी मोठी झेप

एका मसाल्याच्या कंपनीने सांगितले की, केटरर्स, हॉटेल्स आणि लग्नसमारंभात काळ्या मिरीला खूप मागणी आहे.
भारतीय काळी मिरीच्या दरात चार वर्षांनी मोठी झेप
भारतीय काळी मिरीच्या दरात चार वर्षांनी मोठी झेप Dainik Gomantak

तब्बल चार वर्षानंतर काळ्या मिऱ्याचा भाव पुन्हा एकदा 500 रुपयांच्यावर पोहोचला आहे. यंदाच्या सणासुदीचा हंगाम आणि कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे काळ्या मिऱ्याचा मागणीत वाढ झाल्यामुळे भावही तेजीत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यंदाचा सणासुदीचा हंगाम सुरू होताच काळ्या मिरीचे भाव वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यात काळ्या मिऱ्याच्या दरात सुमारे 5 टक्क्याने वाढ होऊन ती 511 रुपये किलोवर आली आहे. पुढील वर्षी कापणीच्या हंगामापर्यंत भाव चढेच राहतील अशी व्यापारी आणि निर्यातदारांची अपेक्षा आहे.

* काळी मिरी काढणीचा हंगाम डिसेंबरमध्ये सुरू होतो जो मार्चपर्यंत चालतो. पुढील वर्षी खराब हवामानामुळे पीक उत्पादनावर परिणाम झाल्यच्या बातम्यांमुळे मिरचीच्या दारतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. एका मसाल्याच्या कंपनीने सांगितले की, केटरर्स, हॉटेल्स आणि लग्नसमारंभातून काळ्या मिरीला खूप मागणी आहे. विशेषत: हरियाणा, गुजरात, आणि राजस्थानमध्ये मागणी वाढली आहे.

भारतीय काळी मिरीच्या दरात चार वर्षांनी मोठी झेप
बिटकॉइनच्या किंमतीत मोठी घसरण?

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मिरचीचा भाव अधिक

इतर मिरपूड उत्पादन देशांप्रमाणे, भारतात पिकवलेल्या मिरचीच्या किमती मुख्यत्वे देशांतर्गत मागणीनुसार ठरवल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काळ्या मिरीच्या किमती जूनपासून वाढत आहेत कारण व्हिएतनामचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या व्हिएतनामामधील उत्पादनात घाट झाली आहे आणि चीनने खरेदी वाढवली आहे. एका अहवालनुसार व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये मिऱ्याचा भाव प्रती टन 4300 ते 4500 डॉलरपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय काळी मिरीची स्पर्धा नाही. मलेशियन मिरीची 5,200 डॉलर प्रती टन यादराने विकली जात असतात, भारतीय मिरीची किमत 6,780 डॉलर प्रती टन आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com