भारतीय अर्थव्यवस्था येतेय रुळावर; मोदी सरकारसाठी गुड न्युज

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

भारतीय अर्थव्यवस्था मंदीतून पुन्हा सावरत चालली असल्याचे चित्र आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेने चालू वित्तीय वर्षातील तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) 0.4 टक्क्यांनी गाठला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था मंदीतून पुन्हा सावरत चालली असल्याचे चित्र आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेने चालू वित्तीय वर्षातील तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) 0.4 टक्क्यांनी गाठला आहे. व त्यासह भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सकारत्मक रुळावर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दोन तिमाहींमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने नकारात्मक वाढ नोंदवली होती. कोरोनाच्या काळामुळे लागू करण्यात आलेल्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून मध्ये विकास दर उणे 23.9 नोंदला गेला होता. तर दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर मध्ये तो काहीसा सुधारत उणे 7.5 टक्के झाला होता. मात्र आता यात चांगली सुधारणा दिसून येत जीडीपी सकारत्मक नोंदला गेला आहे. 

Share Market : भांडवली बाजार कोसळला; सेन्सेक्स तब्बल 3.80 व निफ्टी 3.76...

आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत जीडीपीने नकारात्मक वाढ नोंदवल्यानंतर तिसऱ्या तिमाहीत विकास दर 0.5 टक्केच राहणार असल्याचे अनुमान अनेक वित्तीय संस्थांनी वर्तविले होते. परंतु आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये जीडीपी सकारत्मक 0.4 टक्के नोंदला गेला आहे. आणि त्यामुळे भारत हा आता जगातील काही मोजक्याच देशांच्या यादीत पोहचला आहे, ज्यांनी 2020 च्या आर्थिक वर्षात पुन्हा सकारात्मक विकास दर गाठला आहे. 

निवडणुकांच्या घोषणेआधी तमीळनाडू सरकारची 'गोल्डन भेट'

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात लादलेल्या निर्बंधांमुळे 2020-21 च्या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत विकास दर उणे 23.9 आणि दुसऱ्या तिमाहीत उणे 7.5 नोंदवला गेला होता. परंतु आता विकास दर पुन्हा सकारात्मक नोंदवला गेल्यामुळे भारत मंदीच्या छायेतून बाहेर येत असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या