
Indian Railways General Coach: रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर हा तुमच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. रेल्वेने अनेक गाड्यांमधून जनरल डबे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हीही उत्तर प्रदेशला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
दिल्ली (Delhi) ते यूपीला दररोज अनेक गाड्या धावतात, मात्र यापैकी गोरखपूरला जाणाऱ्या गाड्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. गोरखधाम एक्स्प्रेससह अनेक गाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
आतापासून जनरल डब्यांच्या जागी वातानुकूलित बोगी बसवण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढू शकतो. त्याचबरोबर गरीब वर्गातील लोकांना मोठा धक्का बसू शकतो.
2 वर्षांपूर्वीपर्यंत गोरखधाम एक्सप्रेसमध्ये 9 जनरल बोगी होत्या, मात्र गुरुवारपासून या ट्रेनमध्ये फक्त 3 डबे वापरण्यात येणार आहेत. या बोगींच्या जागी रेल्वेने 7 वातानुकूलित बोगी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच इतर अनेक गाड्यांमधील सर्वसाधारण बोगींची संख्याही कमी करण्यात आली आहे.
माहिती देताना रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, स्लीपरने प्रवास करणारे प्रवासी आता एसी ने प्रवास करत आहेत, त्यामुळे एसीची प्रतीक्षा यादी अनेक दिवसांपासून वाढत आहे. यावर लक्ष ठेवले जात आहे. एसीची वाढती प्रतीक्षा यादी पाहता रेल्वेने (Railway) सर्वसाधारण बोगींची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.