Indian Railways: 1 जुलैपासून ट्रेनमध्ये पुन्हा ज्येष्ठ नागरिक सवलत लागू होणार का ?

Senior Citizens Concessions in Indian Railways: भारतीय रेल्वेमध्ये 2 वर्षांहून अधिक काळ बंद असलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा लागू होणार आहे का?
Indian Railways: 1 जुलैपासून ट्रेनमध्ये पुन्हा ज्येष्ठ नागरिक सवलत लागू होणार का ?
Indian RailwayDainik Gomantak

भारतीय रेल्वेने कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या भाड्यातील सवलत तात्पुरती थांबवली होती. तेव्हापासून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात कोणतीही सवलत मिळत नाही. पण आता एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रेल्वे 1 जुलैपासून ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा लागू करणार आहे. जाणून घ्या या मॅसेजमागचे सत्य काय आहे. (indian railways is not going resume concessions senior citizens july 1 viral message fake)

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या काही संदेशांद्वारे असा दावा केला जात आहे की 1 जुलैपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत पुन्हा सुरू होईल. रेल्वे मंत्रालयाने असा कोणताही आदेश किंवा घोषणा जारी केलेली नाही. सध्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या (Railway) भाड्यात सवलत मिळणार नाही.

Indian Railway
यूएस फेडरल रिझर्व्हने वाढवलेल्या व्याजदराचा भारतीय बाजारांवर काय परिणाम होईल?

PIB Fact Check ने काही वेळापूर्वी ट्विट (Twitter) करत स्पष्ट केले होते की, रेल्वे मंत्रालयाने 1 जुलैपासून ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक सवलत लागू करण्याचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. मीडिया रिपोर्टमध्ये अशी सूट लागू करण्याची चर्चा दिशाभूल करणारी आणि फेक आहे. सध्या भारतीय रेल्वे दिव्यांगजन, रुग्ण आणि विद्यार्थी (Student) यांनाच भाड्यात सवलत देत आहे.

* रेल्वे मंत्रालयाचे म्हणने
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा कधी लागू होणार, याबाबत रेल्वेला जाब विचारला असता, अधिकाऱ्यांनी सध्या याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या तरी ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती लागू करण्याचा सरकारचा किंवा रेल्वे मंत्रालयाचा कोणताही हेतू नाही, असे मानता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com