Indian Railways: प्रवाशांसाठी खूशखबर, वंदे भारताबाबत रेल्वेमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

Railways Update on Vande Bharat: देशातील 75 शहरांना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वंदे भारत एक्सप्रेसने जोडण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak

Vande Bharat: देशातील 75 शहरांना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वंदे भारत एक्सप्रेसने जोडण्याची केंद्र सरकारची योजना आहे. सध्या सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस देशातील दिल्ली ते बनारस आणि दिल्ली ते कटरा या मार्गावर चालवली जात आहे. लवकरच मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तिसरी वंदे भारत चालवण्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान, नव्या वंदे भारतने चाचणीदरम्यान पिकअपच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनने (Train) चाचणी रन दरम्यान केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठून मोठे यश मिळवले आहे.

Indian Railway
Indian Railways: प्रवाशांचे बल्ले-बल्ले! सणासुदीच्या काळात ट्रेनमधून करा मोफत प्रवास

वंदे भारतने त्याचा जुना रेकॉर्ड मोडला

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. यापूर्वी सेमी हायस्पीड वंदे भारतने हा वेग 54.6 सेकंदात गाठला होता. म्हणजेच यावेळी 2.6 सेकंद कमी वेळ लागला. अशा प्रकारे वंदे भारतने आपला जुना रेकॉर्ड मोडला आहे. एवढेच नाही तर पिकअपच्या बाबतीतही बुलेट ट्रेनला मागे टाकले आहे.

या प्रकरणात बुलेट ट्रेनच्या पुढे

जपानच्या (Japan) बुलेट ट्रेनला 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी 55 सेकंद लागतात. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेने 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु केली होती. 9 सप्टेंबर 2022 रोजी, वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबाद ते मुंबई (Mumbai) दरम्यान रेल्वे अधिकार्‍यांच्या उपस्थितीत चाचणीदरम्यान जास्तीत जास्त 130 किमी प्रतितास वेगाने धावली.

Indian Railway
Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, या गाड्यांचे भाडे होणार कमी!

कमाल वेग 160 किमी प्रतितास

वंदे भारत एक्स्प्रेसचा कमाल वेग 160 किमी प्रतितास असल्याचा रेल्वेचा दावा आहे. त्यानुसार ट्रेनची रचना करण्यात आली आहे. याशिवाय ही ट्रेन केवळ 140 सेकंदात 0 ते 160 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. तसेच चाचणी दरम्यान ट्रेनने 180 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेग प्राप्त केला आहे. मात्र, ज्या मार्गांवर ट्रेन चालवली जात आहे ते मार्ग अधिक वेगासाठी योग्य नाहीत. अशा परिस्थितीत, ती बहुतेक 130 किमी प्रतितास वेगाने धावेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com