
Indian Railways Update: भारतीय रेल्वेकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात, पण आज आम्ही तुम्हाला एका ट्रेनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही मोफत प्रवास करु शकता. गेल्या 74 वर्षांपासून ही ट्रेन लोकांना मोफत प्रवास देत आहे, परंतु फार कमी लोकांना या ट्रेनबद्दल माहिती आहे. ही ट्रेन कोणती आहे आणि या ट्रेनमधून तुम्ही कोणत्या मार्गावर प्रवास करु शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ट्रेन कोणत्या मार्गावर धावते?
'भाक्रा-नांगल ट्रेन' असे या रेल्वे ट्रेनचे नाव आहे. ही ट्रेन पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) सीमेवर धावते. ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळातर्फे नांगल ते भाक्रा दरम्यान चालवली जाते. तुमचाही भाक्रा-नांगल डॅमला भेट देण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या ट्रेनमधून मोफत प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
ट्रेन कधी सुरु झाली
भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) वेबसाइटनुसार, ही ट्रेन 1948 मध्ये सुरु झाली. भाक्रा नांगल धरण बांधले जात असताना, त्यावेळी ही ट्रेन चालवण्याची गरज होती. भाक्रा-नांगल ट्रेन शिवालिक टेकड्यांमधून 13 किमी अंतर कापते.
दररोज 800 प्रवासी प्रवास करतात
या ट्रेनमधून दररोज सुमारे 800 प्रवासी प्रवास करतात. या ट्रेनमधील प्रवासादरम्यान वाटेत अनेक छोटी गावे आहेत, जिथे लोक प्रवास करतात. यामध्ये कर्मचारी (Employees), पर्यटक आणि शालेय विद्यार्थीही (Students) प्रवास करतात.
ट्रेनचे डबे कसे बनवले जातात?
ही ट्रेन डिझेल इंजिनवर चालते. या ट्रेनमध्ये एका दिवसात 50 लिटर डिझेल लागते. त्याचे इंजिन सुरु झाले की, भाक्रावरुन परत आल्यानंतरच ते बंद होते. ट्रेनमध्ये बसण्यासाठी लाकडी बाकही आहेत. या गाडीने आजूबाजूच्या भाक्रा, बरमाळा, ओलिंडा, नेहळा, हंडोळा, स्वामीपूर, खेडा बाग, कलाकुंड, नांगल, सलंगडी, लिडकोट, जगतखाना, परोईया, चुगाठी, तलवाडा, गोलथाई या गावांतील लोकांना येण्याचा मार्ग आहे. फक्त हे एकच साधन आहे.
ट्रेनचे वेळापत्रक काय आहे
ही ट्रेन नांगलहून सकाळी 7:05 वाजता निघते आणि सुमारे 8:20 वाजता ही ट्रेन भाक्राहून नांगलच्या दिशेने परत येते. त्याच वेळी, पुन्हा एकदा दुपारी 3:05 वाजता नांगल येथून गाडी निघते आणि संध्याकाळी 4:20 वाजता भाक्रावरुन नांगलला परत येते. नांगलहून भाक्रा धरणापर्यंत पोहोचण्यासाठी या ट्रेनला 40 मिनिटे लागतात. ट्रेन सुरु झाली तेव्हा त्यात 10 डबे चालायचे, पण आता फक्त 3 डबे आहेत. या ट्रेनमध्ये एक डबा पर्यटकांसाठी आणि एक महिलांसाठी राखीव आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.