एप्रिलमध्ये भारताची थेट परकीय गुंतवणूक 38 टक्क्यांनी वाढली - केंद्र सरकार 

एप्रिलमध्ये भारताची थेट परकीय गुंतवणूक 38 टक्क्यांनी वाढली - केंद्र सरकार 
FDI

नवी दिल्ली: देशात होणारी थेट परकीय गुंतवणूक( Foreign Invesment ) म्हणजेच एफडीआय (FDI) एप्रिल महिन्यात 38 टक्क्यांनी वाढल्याचा दावा केंद्र सरकारने(Central Government) केला आहे. याउलट मागील वर्षीचा विचार करता याच कालावधीत हि गुंतवणूक  $4.53 अब्ज डॉलर्स इतकी होती तर यावर्षी ती $6.24 अब्ज डॉलर्स इतकी झाली असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. (Indias foreign direct investment increased by 38 percentage in April)

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “एफडीआय धोरणात सुधारणा, गुंतवणूकीची सोय आणि व्यवसाय सुलभ करणे या सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे देशात थेट परदेशी गुंतवणूक वाढली आहे. ” देशात एप्रिल 2021 मध्ये एफडीआय इक्विटीच्या 24 टक्के गुंतवणूकीसह मॉरिशसने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. त्यानंतर अनुक्रमे सिंगापूर 21 टक्के आणि जपान 11 टक्के गुंतवणूक केली आहे. अशी माहीती वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिली आहे. 

यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी) च्या अहवालानुसार २०२० मध्ये भारत जगातील पाचवा सर्वात मोठा एफडीआय प्राप्तकर्ता होता.2020 मध्ये एफडीआय 27 टक्क्यांनी वाढून $64 अब्ज डॉलरवर पोचला असून, 2019 मध्ये ही $51 अब्ज डॉलर इतकी होती.  माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) उद्योगातील अधिग्रहणानंतर भारत  हा देश जगातील पाचवा क्रमांकाचा एफडीआय प्राप्तकर्ता ठरला आहे. असे एका अव्हालात समोर आले आहे. 

देशात आलेल्या कोरोनाच्या महामारी दरम्यान जगभरात डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्याबरोबरच आयसीटी उद्योगाला लक्ष्य करणार्‍या ग्रीनफिल्ड एफडीआय प्रकल्पांच्या घोषणांची उच्च मूल्ये तुलनेत 22 टक्क्यांहून अधिक वाढून ती $81 अब्ज डॉलरने वाढली. 

भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, संगणक एफडीआय इक्विटीच्या प्रवाहातील सुमारे 24 टक्के वाटा घेऊन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे या  महिन्यात अव्वल क्षेत्र म्हणून ओळखले गेले. त्यानंतर सेवा आणि शिक्षण या क्षेत्रांचा क्रमांक लागतो.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com