GDP,GST नंतर देशाच्या औद्योगिक उत्पादनही लाक्षणिक वाढ
Industrial production raised by 11.5 percent Dainik Gomantak

GDP,GST नंतर देशाच्या औद्योगिक उत्पादनही लाक्षणिक वाढ

जुलैमध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन (Industrial production) 11.5 टक्क्यांनी वाढले आहे

कोरोना महामारीनंतर (COVID-19) देशाची अर्थव्यस्था (Indian Economy) आता हळू हळू सुधारताना पाहायला मिळत आहे कारण जुलैमध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन (Industrial production) 11.5 टक्क्यांनी वाढले आहे . शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP Data) च्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्रातील उत्पादन जुलै 2021 मध्ये 10.5 टक्क्यांनी वाढले आहे. जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये खाण उत्पादनात 19.5 टक्के आणि वीजनिर्मितीत 11.1 टक्के वाढ झाली आहे.(Industrial production raised by 11.5 percent)

जुलै 2020 मध्ये IIP मध्ये 10.5 टक्क्यांनी घट झाली होती. या वर्षी एप्रिल-जुलै दरम्यान आयआयपी 34.1 टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी याच कालावधीत औद्योगिक उत्पादनातं 29.3 टक्के घट झाली होती.

Industrial production raised by   11.5 percent
Share Market:आता एकाच दिवसात मिळवा तुमची गुंतवूणक रक्कम,SEBIचा दिलासा

कोरोनाव्हायरस महामारीमुळे गेल्या वर्षी मार्चपासून औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक चलन पूर्णपणे कमी झाली आणि एप्रिल 2020 मध्ये त्यात 57.3 टक्क्यांनी घट झाली होती.

दरम्यान दुसरीकडे GDPचा विचार करता काहीदिवसांपूर्वीच केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी निकाल जाहीर केला होता . त्यातही लाक्षणिक वाढ झालेली पाहायला मिळाली होती पहिल्या तिमाहीत संपूर्ण देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) विकास दर विक्रमी 20.1 टक्के आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर निगेटिव्ह 23.9 टक्के होता. जीडीपी हे कोणत्याही देशाचे आर्थिक स्केल मोजण्यासाठी सर्वात अचूक उपाय आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com