Inflation Rate: महागाईवर आली मोठी अपडेट, RBI गव्हर्नरने व्यक्त केली ही अपेक्षा

RBI Governor Shaktikanta Das: ऑक्टोबर महिन्यातील महागाई दरात घट होण्याची अपेक्षा दास यांनी व्यक्त केली.
RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta DasDainik Gomant

Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी किमती वाढवणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगत ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर सात टक्क्यांपेक्षा कमी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 7.4 टक्क्यांवर पोहोचली आहे. अन्न आणि ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे हे घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर गेल्या सहा-सात महिन्यांत सरकार आणि आरबीआयने केलेल्या उपाययोजनांमुळे ऑक्टोबर महिन्यातील महागाई दरात घट होण्याची अपेक्षा दास यांनी व्यक्त केली आहे.

महागाई दर

एका कार्यक्रमात बोलताना दास म्हणाले की, 'महागाई (Inflation) दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट बदलण्याची गरज नाही. कारण सहा टक्क्यांपेक्षा जास्त महागाईचा दर आर्थिक विकासावर परिणाम करेल.' सरकारने चलनवाढीचा दर दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीवर (MPC) सोपवली आहे.

RBI Governor Shaktikanta Das
RBI MPC Meeting: लोन पुन्हा महागणार? महागाई रोखण्यासाठी RBI काय करणार, वाचा

मूलभूत तत्त्वे

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत, आरबीआय गव्हर्नर पुढे म्हणाले की, "ऑक्टोबरसाठी महागाईचा दर 7 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. महागाई ही चिंतेची बाब आहे, ज्याचा आम्ही प्रभावीपणे सामना करत आहोत."

RBI Governor Shaktikanta Das
Digital Rupee: RBI गव्हर्नरांची घोषणा, या महिन्यात ग्राहकांसाठी डिजिटल चलन होणार उपलब्ध

अनेक पावले उचलली

ऑक्टोबर महिन्यातील महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर होणार आहे. ते पुढे म्हणाले की, 'गेल्या सहा-सात महिन्यांत आरबीआय (RBI) आणि सरकार (Government) या दोघांनी महागाई कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकारने पुरवठ्याच्या बाजूने अनेक पावले उचलली आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com