महागाईचा उच्चांक: घाऊक बाजारातील महागाई दर 10.49 टक्क्यांवर पोहचला!

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 मे 2021

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून नुकतीच घाऊक किंमतीची आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच आता कोरोनारुपी राक्षसामुळे सर्वसामान्यांचं जगण कठीण झालं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं आहे. त्याचबरोबर दैनंदिन जगण्यासाठी कामधंदा करणं तितकच महत्त्वाचं आहे. त्यात आता कोरोना संसर्गामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. घाऊक बाजारातील महागाईचा(Inflation)वाढता दर चिंता वाढवत आहे. (Inflation peaks Wholesale market inflation rises to 10.49 per cent)

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून (Ministry Of Commerce & Industry)नुकतीच घाऊक किंमतीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातच मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील वाढता महागाई दर डोकेदुखी ठरत आहे. फळं, मांस, डाळी यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तर दुसरीकडे तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमती कमी झाल्याचं दिसून आलं आहे. मार्च महिन्यात महागाईचा दर हा 7.39 टक्के होता. आता एप्रिल महिन्यात तो 10.49 टक्क्यांवर पोहचला आहे. महागाई दरात एकाच महिन्यात जवळपास 3.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे हा महागाई दर वाढल्याचं सांगण्यात येत आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थांना मिळणार स्वस्तात लोन; जाणून घ्या

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांची आकडेवारी समोर ठेवली आहे. फेब्रुवारीत महागाई दर 4.83 टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर 2.56  टक्क्यांनी वाढला आणि 7.39 टक्क्यांवर पोहचला आहे. तर मार्च महिन्याच्या तुलनेत महागाई दर 3.1 टक्क्यांनी वाढला असून तो आता 10.49 टक्क्यांवर पोहचला आहे.

संबंधित बातम्या