Insurance Claim After 48 Hours: वाहन चोरीला गेल्यास 48 तासांनंतरही इन्शुरन्स क्लेम करता येईल, जाणून घ्या ग्राहक मंचचा निर्णय

वडोदरा येथील ग्राहक मंचाने विमा कंपनीला अशाच एका प्रकरणात दावा भरण्याचे निर्देश दिले आहेत.
Insurance Claim
Insurance ClaimDainik Gomantak

Insurance Claim After 48 Hours: जर तुमची कार किंवा बाईक चोरीला गेले असेल आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करण्यास उशीर झाला असेल तर आता टेंशन नका घेउ.

कारण आता पोलिसांकडे तक्रार करण्यासह तुम्ही विमा कंपनीकडे वाहन चोरीचा क्लेम करु शकता.

वडोदरा जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने विमा कंपनीला वाहन चोरीच्या दिवसापासून ते पैसे भरल्याच्या तारखेपर्यंत आठ टक्के व्याजासह दावा भरण्याचे आदेश दिले आहेत.

यासोबतच विमा कंपनीला कायदेशीर खर्चासाठी 1000 रुपये आणि मानसिक छळासाठी 1000 रुपये देण्याचे निर्देश मंचाने दिले आहेत.

  • 103 दिवसांनंतर केला क्लेम

वडोदरातील आशिष गांधी यांनी 2016 मध्ये बाइक खरेदी केली होती. त्यांनी फेब्रुवारी 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्सद्वारे विमा केला होता.

ऑक्टोबर 2022 मध्ये गांधींची बाईक चोरीला गेली होती. गांधी यांनी गाडी चोरीला गेल्यानंतर 97 दिवसांनंतर पोलिसांकडे वाहन चोरीची ऑनलाइन तक्रार केली आणि त्यानंतर वाहन

चोरीची माहिती विमा कंपनीला देऊन क्लेमची मागणी केली होती. पण विमा कंपनीने 48 तासांपर्यंत दावा दाखल न केल्याचे कारण देत त्यांचा क्लेम नाकारला. त्यामुळे आशिष गांधी यांनी वडोदरा जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या मंचावर या प्रकरणाची तक्रार नोंदवली.

Insurance Claim
Amitabh Bachchan: बिग बींनी पुन्हा घेतली एलन मस्क यांची फिरकी; ट्वीटवर चाहत्यांच्या अतरंगी कमेंटसचा पाऊस

आयोगाने सुनावणी दरम्यान सांगितले की, विमा कंपनीने गांधी यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला. ज्या दिवशी वाहन चोरीला गेले त्या दिवशी वाहनाचे स्टेअरिंग लॉक केलेले नव्हते.

तर तिकडे गांधी यांनी तक्रारीला उशीर झाल्याबद्दल सांगितले आणि दावा केला की ते तीन महिन्यांपासून दुचाकीचा शोध घेत होते.

वाहन सापडला नाही तेव्हा दावा केला. यावर फोरमने म्हटले आहे की, हरवलेले वाहन 97 दिवस शोधत राहणे आणि 103 दिवसांनंतर विमा कंपनीला माहिती देणे शक्य नाही.

फोरमने हे विमा पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर फोरमने आपल्या निकालात विमा कंपनीला वाहनाच्या किमतीच्या 70 टक्के रक्कम चोरीच्या दिवशी भरण्याचे निर्देश दिले.

विमा कंपनीने तक्रारदाराला 14,973 रुपये द्यावेत असा आदेश फोरमने आदेश दिला आहे. या रकमेसोबतच वाहन चोरी झाल्याच्या दिवसापासून दावा भरल्याच्या तारखेपर्यंत 8 टक्के दराने व्याजही द्यावे.

फोरमने आपल्या आदेशात विमा कंपनीला कायदेशीर खर्चासाठी 1000 रुपये आणि मानसिक छळासाठी 1000 रुपये देण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com