केंद्राच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर ‘जैसे थे’!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२१) ‘पीपीएफ’, ‘एनएससी’सह विविध अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत.

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२१) ‘पीपीएफ’, ‘एनएससी’सह विविध अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. सलग तिसऱ्या वेळी सरकारने व्याजदर कायम ठेवल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत अल्पबचत योजनांच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली होती. त्यावेळी साधारणपणे ०.७० टक्के ते १.४० टक्के इतकी मोठी कपात केल्याने गुंतवणूकदारांना मोठी झळ बसलेली होती.
 

संबंधित बातम्या