Government Scheme: सरकारचा मोठा निर्णय, SCSS, सुकन्या योजनासह लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ

Small Savings Schemes Interest Rates: सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेचा व्याजदर 7.1 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Money
MoneyDainik Gomantak

Small Savings Schemes Interest Rates: 2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत, 31 मार्च रोजी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी खाते योजना, मासिक उत्पन्न बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र यासह विविध लहान बचत ठेवी आणि पोस्ट ऑफिस मुदत ठेवी योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.

मात्र, सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेचा व्याजदर 7.1 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी ही घोषणा केली. मंत्रालयाने 1 एप्रिलपासून सुरु होणार्‍या तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांवरील व्याजदरात 70 बेसिस पॉईंट्सपर्यंत (एक टक्के पॉइंट 100 बीपीएसच्या बरोबरीने) वाढ केली आहे.

Money
Modi Government Scheme: मोदी सरकार महिलांना देतेय 52,000 रुपये! मोठा खुलासा झाला

पुढील महिन्यापासून नवीन व्याजदरांवर एक नजर

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8 टक्क्यांवरुन 8.2 टक्के, किसान विकास पत्रासाठी 7.2 टक्क्यांवरुन 7.5 टक्के करण्यात आला आहे.

सरकारने (Government) एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या एफडीवरील व्याजदरही अनुक्रमे 6.6 टक्के, 6.8 टक्के, 6.9 टक्के, 7.0 टक्क्यांवरुन 6.8 टक्के, 6.9 टक्के, 7.0 टक्के आणि 7.5 टक्के केले आहेत.

त्याचबरोबर, मासिक उत्पन्न खाते योजनेचा व्याजदरही सध्याच्या 7.1 टक्क्यांवरुन 7.4 टक्के करण्यात आला आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा व्याजदर 7 टक्क्यांवरुन 7.7 टक्के करण्यात आला आहे.

Money
Government Scheme: विवाहित महिलांसाठी खूशखबर! सरकार देणार एवढी मोठी रक्कम

तसेच, सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) धारकांना आता 7.6 टक्के ते 8 टक्के व्याज मिळणार आहे. सरकारने गेल्या नऊ महिन्यांत तिसऱ्यांदा अल्पबचत योजनांवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. सध्या छोट्या बचत योजनांवर 4 टक्के ते 8.2 टक्के व्याजदर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com