
Saving Scheme: मोदी सरकार जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे.
त्याचवेळी, नुकतीच मोदी सरकारने महिलांसाठी एक योजना सुरु केली. या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
आता या योजनेबाबत मोदी सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. वास्तविक, आता या योजनेत महिलांना करात सवलत मिळणार आहे.
महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर आता TDS कापला जाणार नाही, असे सरकारने (Government) जाहीर केले आहे. CBDT अधिसूचनेनुसार पात्र टॅक्स स्लॅब्सनुसार, व्याज उत्पन्नावर कर आकारला जाईल. CBDT ने 16 मे रोजी बचत योजनेसाठी TDS तरतूद अधिसूचित केली. योजनेंतर्गत मुलगी किंवा महिलेच्या नावाने खाते उघडता येते.
CBDT अधिसूचना स्पष्ट करते की, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) वर मिळणाऱ्या व्याजावर TDS लागू होत नाही, जर असे व्याज आर्थिक वर्षात 40,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल.
वास्तविक, ही योजना 7.5% व्याजाने एका वर्षात 15,000 रुपये आणि दोन वर्षांत 32,000 रुपये परतावा देईल. असे म्हणता येईल की, कोणताही TDS लागू होणार नाही, कारण एका आर्थिक वर्षात मिळणारे व्याज रु.40,000 पेक्षा कमी असेल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुरु करता येते. हे अंशतः पैसे काढण्याच्या पर्यायांसह तिमाही चक्रवृद्धीचे निश्चित व्याज देते.
ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे. या योजनेत 7.5% व्याज उपलब्ध आहे. तसेच, यात कमाल 2 लाख रुपये गुंतवणुकीची (Investment) मर्यादा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.