Post Office Scheme: दररोज 95 रुपये जमा करा आणि 14 लाख मिळवा

ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स स्कीममध्ये, तुम्ही दररोज 95 रुपये गुंतवू शकता आणि 14 लाख जमा करू शकता
Post Office Scheme: दररोज 95 रुपये जमा करा आणि 14 लाख मिळवा
Post Office Scheme Dainik Gomantak

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांवर ग्राहकांचा विश्वासही आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षितत असून वेळेत योग्य तो रिटर्न देतात. यापैकीच एक योजना म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Gram Sumangal Rural Postal Life Insurance Scheme)आहे. ज्यामध्ये तुम्ही दररोज 95 रुपये गुंतवू शकता आणि मैच्योरिटीच्या वेळी सुमारे 14 लाख रुपये मिळवू शकता. नावाप्रमाणेच, ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना ही ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) वेबसाइटनुसार, ही योजना मनी बॅक पॉलिसी (Money Back Policy) आहे.

पोस्ट ऑफिसच्या मते, ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी सर्वात फायदेशीर आहे ज्यांना वेळेत रिटर्नची आवश्यक आहे. पॉलिसी अंतर्गत विमा कंपनीला वेळोवेळी सर्व्हायव्हल बेनिफिट देखील दिला जातो. विमाधारकाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास, बोनससह संपूर्ण विमा रक्कम नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाकडे दिली जाते.

Post Office Scheme
Government Scheme: खुशखबर! तुमच्या घरातील मुलींना सरकार देणार 15000 रुपये

ग्राम सुमंगल योजनेसाठी वयोमर्यादा

ग्राम सुमंगल योजनेत गुंतवणूक करण्याचे किमान वय 19 वर्षे आहे. पोस्ट ऑफिस प्लॅनमध्ये प्रवेशाचे कमाल वय 20 वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीसाठी 40 वर्षे आणि 15 वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे आहे ठेवण्यात आले आहे.

मॅच्युरिटीवर बोनसचा लाभ

ग्राम सुमंगल योजनेत, गुंतवणूकदाराला पैसे परतीचा लाभ मिळतो, जो तीनदा दिला जातो. 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षे, नऊ वर्षे आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर 20 टक्के रक्कम परत मिळते. यानंतर, मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कम देखील गुंतवणूकदारांना प्रदान केली जाते.

दररोज 95 रुपये गुंतवून 14 लाख रुपये कसे मिळवायचे?

जर गुंतवणूकदार 25 वर्षांचा असेल आणि 7 लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसह 20 वर्षांसाठी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असेल तर मासिक हप्ता 2853 रुपये किंवा सुमारे 95 रुपये प्रतिदिन असेल. या योजनेत वार्षिक प्रीमियम 32,735 रुपये असेल.

Post Office Scheme
Reliance Recruitment: 10 लाख लोकांना मिळणार रोजगार

या योजनेनुसार गुंतवणूकदाराला 8व्या, 12व्या आणि 16व्या वर्षी 1.4 लाख रुपये मिळतील. 20 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला 2.8 लाख रुपयांच्या वीमा रकमेचा लाभ आणि 48 रुपये प्रति हजार वार्षिक बोनस मिळेल. 20 वर्षांच्या कालावधीत एकूण बोनस 6.72 लाख रुपये असेल. सर्व हप्ते आणि बोनस जोडल्यास, गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीच्या वेळी एकूण 13.72 लाख रुपये मिळतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com