LIC Plan: महिन्याला करा 2 हजारांची गुंतवणूक अन् मिळवा 48 लाखांहून अधिकचा परतावा

LIC Best Plan: श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते.
LIC
LICDainik Gomantak

High Return LIC Policy: श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र ही स्वप्ने काहीचींच पूर्ण होतात. लोकांना वाटते की शेअर मार्केटमध्ये अशा ठिकाणी पैसे गुंतवा, जे प्रत्येक वेळी परतावा देईल. परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, ते इतके सोपे नाही. शेअर बाजारातून प्रत्येक वेळी नफा मिळवणे शक्य नाही.

दरम्यान, काही वेळा गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसानही सहन करावे लागते. म्हणूनच, जर तुम्हाला कोणत्याही तणावाशिवाय गुंतवणूक करायची असेल, तर ही एलआयसी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. या योजनेत तुम्हाला फक्त 2079 रुपयांची मासिक गुंतवणूक करावी लागेल. या संपूर्ण योजनेबद्दल जाणून घेऊया...

LIC
Pension Plan: LIC ने लाँच केली नवी पेन्शन योजना, वाचा सविस्तर एका क्लिकवर

प्‍लान नंबर 914 खास

भारतीय आयुर्विमा महामंडळ गुंतवणूकदारांसाठी विविध योजना चालवत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळतो. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या या विमा कंपनीवर लोकांचा विश्वास असल्यामुळे लोक LIC मध्ये सहज गुंतवणूक करतात. याशिवाय ती सरकारी कंपनी असल्याने तिच्यावर विश्वास ठेवला जातो. आम्ही तुम्हाला एलआयसीच्या प्लान नंबर 914 बद्दल सांगत आहोत, जो काही अर्थाने खूप खास आहे. या पॉलिसीद्वारे तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता.

या पॉलिसीतील काही ठळक मुद्दे

ही पॉलिसी मिळविण्यासाठी, किमान वय 8 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे. या प्लॅनमध्ये, तुम्हाला किमान 12 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षांची मुदत घ्यावी लागेल, म्हणजेच तुम्हाला या प्लॅनमध्ये किमान 12 वर्षे गुंतवणूक (Investment) करावी लागेल, तर जास्तीत जास्त 35 वर्षे गुंतवणूक करता येईल. किमान या योजनेत तुम्हाला 1 लाख रुपयांची विमा रक्कम ठेवावी लागेल.

LIC
LIC Aadhaar Shila Yojana: 29 रुपये गुंतवल्यास मिळेल 4 लाखांचा रिटर्न, घ्या जाणून

याप्रमाणे 2 हजारांच्या गुंतवणुकीवर 48 लाख रुपये मिळवा!

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षी प्लान क्रमांक 914 सुरु केला तर पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचा विमा मिळेल. तसेच, टर्म 35 वर्षांची करावी लागणार. अशा परिस्थितीत, या प्लॅनची ​​किंमत वार्षिक 24391 रुपये असेल म्हणजेच प्रत्येक महिन्याला 2079 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. या योजनेअंतर्गत 35 वर्षांनंतर गुंतवणूकदाराला (Investors) 48 लाख 40 हजार रुपयांचा परतावा मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com