अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ रेल्वे रद्द? तिकीट परताव्यासाठी हे करा काम

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक निशाण्यावर भारतीय रेल्वे आहे.
अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ रेल्वे रद्द? तिकीट परताव्यासाठी हे करा काम
railwayDainik Gomantak

Agnipath Scheme Protest: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक निशाण्यावर भारतीय रेल्वे आहे. योजना सुरु झाल्यानंतर आतापर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे, तर काउंटर आणि ट्रॅकचीही तोडफोड करण्यात आली आहे. (irctc agneepath protest train cancelled how to get refund what is rule of indian railway detail)

दरम्यान, रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवासी नाराज झाले आहेत, तर तिकीटाचे पैसे म्हणजे परतावा मिळवण्याबाबत चिंतेत आहेत. मात्र, ट्रेन (Train) रद्द केल्यानंतर तिकीट रिफंडची पद्धत काय आहे ते समजून घेऊया...

 railway
Agnipath Scheme Protest: सिकंदराबादमध्ये 1 ठार, 15 हून अधिक जखमी

काउंटरवर तिकीट बुकिंग

जर तुम्ही काउंटरवर तिकीट बुक केले असेल, तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या तिकीट काउंटरवर जाऊन फॉर्म सबमिट करावा लागेल. तथापि, हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करुन किंवा IRCTC वेबसाइटला भेट देऊन काउंटर तिकीट रद्द करु शकता, परंतु परतावा मिळवण्यासाठी काउंटरला भेट द्यावी लागेल. काउंटर तिकीट घेताना फॉर्ममध्ये मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे, कारण रद्द करताना त्याच नोंदणीकृत क्रमांकावर OTP पाठवला जातो.

 railway
Agnipath: 'एवढा विरोध होईल वाटलं नव्हतं...', नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

3 तासांपेक्षा जास्त उशीर

जर ट्रेनला 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल आणि प्रवासी प्रवास करत नसेल, तर तुम्ही तिकीट (TDR) सबमिट करुन परतावा मिळवू शकता. ही प्रक्रिया IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅप व्यतिरिक्त काउंटरवर पूर्ण करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com