Indian Railway मध्ये मिळणार 'सात्विक भोजन': IRCTC ने इस्कॉन मंदिराशी केला करार

कांदा-लसूण न खाणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेत IRCTC ने इस्कॉन मंदिराशी करार केला आहे.
IRCTC
IRCTCDainik Gomantak

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि शाकाहारी जेवण खात असाल तर इंडियन रेल्वे (Indian Railway) केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने तुमच्यासाठी एक खास योजना आखली आहे. भारतीय रेल्वेने यासाठी इस्कॉन मंदिराशी करार केला आहे. या करारामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला इस्कॉन मंदिराच्या गोविंदा रेस्टॉरंटचे 'सात्विक भोजन' मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकापासून ही सुविधा सुरू करण्यात आली. आता लवकरच इतर स्थानकांवरही ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. (IRCTC has entered into an agreement with ISKCON Temple)

IRCTC
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, MSP वाढवण्यास दिली मान्यता

ट्रेनमध्ये लांबचा प्रवास करताना अनेक प्रवाशांना शुद्ध शाकाहारी अन्नाची समस्या उद्भवत असते. त्यातलीत्यात असे प्रवासी जे कांदा-लसूण खात नाहीत. अशा प्रवाशांना पॅन्ट्री कारमधून किंवा ई-कॅटरिंगमधून मिळणाऱ्या खाद्यपदार्थाच्या शुद्धतेबाबतची शंका असते. आणि यामुळे ते पँट्री फूड खाने टाळत असतात. अशा प्रवाशांना लक्षात घेऊन आयआरसीटीसीने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. IRCTC 'देखो अपना देश' अंतर्गत देशाच्या विविध भागांसाठी परवडणारी टूर पॅकेज ऑफर करत आहे आणि याअंतर्गत तो अनेक धार्मिक स्थळांची यात्राही करत आहे.

या डिश आहेत

IRCTC ने सांगितले की, प्रवाशांची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली. सात्विक भोजनाच्या मेनूमध्ये डिलक्स थाळी, महाराजा थाळी, जुनी दिल्ली व्हेज बिर्याणी, नूडल्स, दाल मखनी, पनीर डिश आणि इतर सात्विक पदार्थांचा समावेश असणार आहे. आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंग वेबसाइट किंवा फूड-ऑन-ट्रॅक अॅपद्वारे प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्यांना प्रवासाच्या नियोजित वेळेच्या किमान 2 तास आधी पीएनआर क्रमांकासह ऑर्डर द्यावी लागणार आहे. प्रवाशांना त्यांच्या जागेवर 'सात्विक भोजन' दिले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com