आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढली; करदात्यांना दिलासा!

CBDT ने आज जाहीर केले की AY 2021-22 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 15 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. तारखांमध्ये ही सूट सामान्य करदात्यांना नाही.
आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढली; करदात्यांना दिलासा!
IT return filing deadline extendedDainik Gomantak

कोरोनाच्या सतत वाढत चाललेल्या प्रकरणांचे आव्हान आणि इलेक्ट्रॉनिक फाइलिंगमधील अडचणी लक्षात घेता, सरकारने रिटर्न भरण्यात व्यावसायिक करदात्यांना दिलासा देत आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याची घोषणा केली आहे. CBDT ने आज जाहीर केले की AY 2021-22 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 15 मार्च पर्यंत वाढवण्यात (IT return filing deadline extended) आली आहे. तारखांमध्ये ही सूट सामान्य करदात्यांना नाही. CBDT च्या या सवलतीशी संबंधित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

IT return filing deadline extended
पेट्रोल डिझेलनंतर कपड्यांचा महागाईत लागला नंबर!

सीबीडीटीने (CBDT) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, कोविडला भेडसावणाऱ्या अडचणी आणि इलेक्ट्रॉनिक अहवाल दाखल करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सीबीडीटीने शेवटच्या तारखा वाढवल्या आहेत. यासोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या तारखा आहेत. ज्या वाढवल्या ​​आहेत.

ही वाढ व्यावसायिक करदात्यांसाठी वाढवण्यात आली आहे, खरेतर, रिटर्न भरण्याबरोबरच कॉर्पोरेट करदात्यांना अनेक महत्त्वाच्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात, अवघड प्रक्रिया आणि कोविडचे आव्हान पाहता, CBDT ने करदात्यांना अंतिम मुदतीत दिलासा देण्याची घोषणा केली आहे. ज्या करदात्यांना त्यांच्या खात्यांचे कोणत्याही नियमांतर्गत लेखापरीक्षण करावे लागेल त्यांना ह्या सवलत मिळणार आहे. अंतिम मुदत वाढल्याने करदात्यांना ऑडिट करण्यासाठी वेळ मिळेल.

सीबीडीटीचा हा निर्णय कॉर्पोरेट करदात्यांसाठी आहे. अशा स्थितीत या निर्णयाचा सर्वसामान्य करदात्यांना काहीही परिणाम होणार नाही. म्हणजेच त्यांच्यासाठी रिटर्नची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती आणि जे या कालावधीत रिटर्न भरू शकले नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.

IT return filing deadline extended
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी 'या' खास सुविधा उपलब्ध

तुमचे उत्पन्न 5 लाखांपर्यंत असल्यास विलंब शुल्क एक हजार रुपये आणि उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास ही विलंब शुल्क 10 हजार रुपयांपर्यंत भरावी लागेल. जर तुमचा कर देय असेल आणि तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमचे विवरणपत्र भरले नसेल, तर एक दिवस उशीर झाला तरी तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी 1 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. जर तुमचा कर अधिक कापला गेला असेल आणि तुम्ही परतावा घेणार असाल परंतु 31 तारखेपर्यंत रिटर्न भरला नसेल, तर तुम्हाला हा परतावा घेण्यासही विलंब होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com