Janani Suraksha Yojana: आता 'या' महिलांना मिळणार 6 हजार रुपये !

Janani Suraksha Yojana 2023: जननी सुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब घटकातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करत आहे.
Women
WomenDainik Gomantak

Janani Suraksha Yojana 2023: देशातील गर्भवती महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब घटकातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करत आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत आरोग्य विभागाकडून बाळाच्या जन्मानंतर महिलांना 6000 रुपयांचा धनादेश दिला जातो. मात्र, ही सुविधा त्या महिलांनाच उपलब्ध आहे. ज्यांची प्रसूती सरकारी रुग्णालयात झाली आहे. ही योजना सुरु करण्यामागील सरकारचा उद्देश गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या काळजीसाठी आर्थिक मदत करणे हा होता. विशेष म्हणजे, जननी सुरक्षा योजना वेगवेगळ्या राज्यांमध्ये राबवण्यात येत आहे.

नवजात मुलासाठी पुरेसे पोषण

वास्तविक, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक वेळा महिलांना आपल्या मुलाची योग्य काळजी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे मूल जन्माला येताच त्याला अनेक आजारांनी घेरले जाते. ही समस्या गांभीर्याने घेत, अर्भकांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना सुरु केली. आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, देशात दररोज हजारो मुले जन्माला येतात. 60 टक्क्यांहून अधिक मुले अशा प्रकारे जन्माला येतात. दुसरीकडे, ज्यांचे कुटुंब बीपीएल श्रेणीत येते, अशा कुटुंबातील गर्भवती महिला (Women) या योजनेअंतर्गत अर्ज करु शकतात.

Women
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत सरकारने केले 5 मोठे बदल, माहित नसेल तर...

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी होण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारी रुग्णालयाने दिलेले प्रमाणपत्रही असावे. यासोबतच संबंधित महिलेचे बँक खाते असणेही आवश्यक आहे. सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम या बँक (Bank) खात्यात जमा केली जाईल. तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे ASHA मार्फत आरोग्य केंद्रात जमा करावी लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com