
Bisleri Company Owner: जेव्हा कोणी बाहेरुन पाण्याची बाटली विकत घेतो तेव्हा एक ब्रँड सर्वांच्या ध्यानात येतो आणि तो म्हणजे बिस्लेरी. बिस्लेरी पाण्याची बाटली भारतात मोठ्या प्रमाणात विकत घेतली जाते.
त्याचवेळी, बिस्लेरी कंपनीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) ने अधिग्रहण प्रक्रियेतून माघार घेतल्याने बिस्लेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान आता कंपनीची प्रमुख असेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, बिस्लेरीचे चेअरमन रमेश चौहान म्हणाले की, "जयंती आमच्या व्यावसायिक टीमसोबत कंपनी चालवेल आणि आम्हाला व्यवसाय विकायचा नाही." 42 वर्षीय जयंती चौहान सध्या तिच्या वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षा आहेत. जयंती चौहान यांनी त्यांचे बालपण दिल्ली, मुंबई (Mumbai) आणि न्यूयॉर्क शहरात घालवले आहे.
दुसरीकडे, हायस्कूल पूर्ण केल्यानंतर, जयंती चौहान लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइझिंग (FIDM) मध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा अभ्यास करण्यासाठी गेल्या, त्यानंतर त्यांनी Istituto Marangoni Milano येथे फॅशन स्टाइलिंगचा कोर्स केला.
दुसरीकडे, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, जयंती अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक व्यवस्थापन टीमसोबत काम करणार आहेत. 82 वर्षीय चौहान यांनी या वर्षाच्या सुरुवातीला हा ब्रँड टाटा समूहाला (Tata Group) अंदाजे 7,000 कोटी रुपयांना विकला. भारतातील सर्वात मोठ्या ब्रँडसोबतचा करार टाटा कंझ्युमरच्या "अनिश्चयतेमुळे" रद्द करण्यात आला.
मूल्यांकनाबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. विश्लेषकांच्या मते, प्रवर्तक भविष्यात त्यांचे मत बदलू शकतात. टाटा कंझ्युमरने दोन वर्षांपूर्वी चौहान कुटुंबाशी चर्चा सुरु केली होती, परंतु गेल्या आठवड्यात चर्चा रद्द केली. जयंती गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायाशी संबंधित आहेत. बिस्लेरीच्या पोर्टफोलिओचा भाग असलेला वेदिका ब्रँड अलीकडच्या काही वर्षांत त्यांचे लक्ष केंद्रीत करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.