Jio चा नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन, डिस्ने + हॉटस्टार चे मिळणार 3 महिने मोफत सबस्क्रिप्शन

रिलायन्स जिओने (Jio) नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत.
Jio चा नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन, डिस्ने + हॉटस्टार चे मिळणार 3 महिने मोफत सबस्क्रिप्शन
JioDainik Gomantak

रिलायन्स जिओने नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. ग्राहकांना आवडतील अशा ऑफर यामध्ये देण्यात आल्या आहेत. वास्तविक रिलायन्स जिओने Disney + Hotstar सोबत आपली भागीदारी वाढवली आहे. यासोबतच डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसह तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन तीन महिन्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहेत. Jio च्या या प्लॅन्सबद्दल तपशीलवार जाणून घ्या (Reliance JIO Plans). (Jio launches new prepaid recharge plan)

Jio
IPL ची मजा लुटण्यासाठी Jio चे नवीन प्लॅन

1.Reliance Jio Rs 333 प्रीपेड प्लॅन

रिलायन्स (Reliance) जिओच्या 333 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन अंतर्गत, दररोज 1.5GB डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस दिले जातील. तसेच Disney+ Hotstar Mobile चे तीन महिन्यांचे विनामूल्य सब्सक्रिप्शन देखील यामध्ये असणार आहे. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध असणार आहे.

2.रिलायन्स जिओचा 583 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

583 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 56 दिवसांची वैधता मिळते. अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 100 SMS आणि Disney + Hotstar Mobile चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन 1.5GB डेटासह मोफत दिले जाईल.

Jio
Jio चे 200 रुपयांच्या आतील हे प्लॅन देतात अमर्याद कॉलिंग सेवा!

3.रिलायन्स जिओचा 783 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Reliance Jio Rs 783 प्रीपेड प्लॅनमध्ये 1.5GB दैनिक डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 SMS आणि Disney + Hotstar Mobile चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील असेल. या प्लॅनची वैधता 84 दिवसांपर्यंत आहे. या तिन्ही प्लॅनमध्ये समान ऑफर आहेत. फरक फक्त त्यांच्या वैधतेमध्ये आहे.

तसेच, प्राइम मेंबरशिपसाठी नवीन यूजर्ससाठी 100 रुपये आकारले जातील. नव्या प्रीपेड प्लॅनची वैधता 90 दिवसांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन घेताना यूजर्संना रिचार्ज करावे लागेल. तिन्ही नवीन Jio रिचार्ज प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioCloud आणि Jio अ‍ॅप्सचाही मोफत वापर करता येणार आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर, यूजर्संना त्याच Jio मोबाइल नंबरसह Disney+ Hotstar अ‍ॅपमध्ये साइन इन करणे आवश्यक असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.