Kisan Vikas Patra: पोस्ट ऑफिसची ही योजना करते तुमचे पैसे दुप्पट

किसान विकास पत्र ही एक योजना आहे ज्यामध्ये 10 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतात.
Kisan Vikas Patra: पोस्ट ऑफिसची ही योजना  करते तुमचे पैसे दुप्पट
Kisan Vikas PatraDainik Gomantak

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही एक योजना आहे ज्यामध्ये 10 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्रासाठी असे म्हटले जाते की ते चांगल्या परताव्यासह गुंतवणूकदारांना लवचिकता देत असते. 124 महिन्यांत दुप्पट पैसे देणारी किसान विकास पत्र ही लोकप्रिय योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करणेही सोपे आहे आणि यातून परतावाही चांगला मिळतो. (Kisan Vikas Patra This post office scheme doubles your money)

Kisan Vikas Patra
Sun Pharma च्या हलोल प्लांटला यूएस एफडीएकडून 10 आक्षेप; शेअर्समध्ये मोठी घसरण

किसान विकास पत्र म्हणजे काय

पोस्ट ऑफिस योजनांच्या (Post Office Scheme) अनेक योजनांपैकी किसान विकास पत्राची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला जास्त गणना करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुम्ही कितीही रक्कम जमा करू शकता.

किसान विकास पत्रातील गुंतवणुकीचे मिळतात फायदे

सध्या या योजनेत 6.9 टक्के व्याज दिले जात आहे, या योजनेत 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते आणि गुंतवणुकीसाठी कोणतीही अंतिम मर्यादा नाहीयेत. तुमचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास तुम्हाला सिंगल किंवा जॉइंट खाते उघडता येते. गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या खात्यातून किमान अडीच वर्षे पैसे काढू शकणार नाही. किसान विकास पत्र योजनेत आयकर सवलत देखील उपलब्ध असणार आहे.

Kisan Vikas Patra
एसबीआयने ग्राहकांना दिली भेट, आता ठेवींवर मिळणार मोठा नफा

किसान विकास पत्राचा विशेष नियम घ्या जाणून

KVP प्रमाणपत्र प्रौढ व्यक्ती स्वतःसाठी आणि अल्पवयीन व्यक्तीसाठी खरेदी करू शकतात. याशिवाय, ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकतात आणि एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील सहजरित्या हस्तांतरित केले जाऊ शकतात. KVP खरेदी केल्यानंतर अडीच वर्षांनी हे कॅश रुपात तुम्हाला मिळू शकणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.