Viral Fact Check: निवडणुकीत मतदान न केल्यास बँक खात्यातून कापले जाणार 350 रुपये !

PIB Fact Check: सोशल मीडियाच्या या युगात कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे खूप सोपे झाले आहे.
Female voters
Female voters Dainik Gomantak

PIB Fact Check: सोशल मीडियाच्या या युगात कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे खूप सोपे झाले आहे. नुकतीच एक बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बातमीत अशी माहिती देण्यात आली आहे की, लोकसभा निवडणुकीत जो कोणी मतदान करणार नाही, त्याच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील. मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण मतदान न केल्याबद्दल पैसे कापले जातील, असं खरचं होणार का? या व्हायरल बातमीचे सत्य जाणून घेऊया...

सोशल मीडियावर वृत्तपत्राचे कटिंग व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) वृत्तपत्राचे कटिंग व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने या लोकसभा निवडणुकीत मतदान केले नाही तर त्याच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील. जेव्हा PIB ने या व्हायरल बातमीची सत्यता तपासली तेव्हा ती खोटी बातमी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यात केलेले सर्व दावे खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने (Election Commission) असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुढे, PIB ने लोकांना अशा बातम्या अजिबात शेअर करु नका, असेही सांगितले. यानंतर निवडणूक आयोगाने एका ट्विटमध्ये या व्हायरल बातम्यांना फेक म्हटले आहे. याशिवाय, लोकांना अशा बातम्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

Female voters
Fact Check: सरकार आयुष योजनेंतर्गत दरमहा पैसे देत आहे का ? जाणून घ्या व्हायरल मॅसेजचे सत्य

2019 मध्येही व्हायरल झाले होते

निवडणूक आयोगाने असेही सांगितले की, 2019 मध्ये व्हायरल होत असलेल्या खोट्या बातम्या पुन्हा काही व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ग्रुप्स आणि सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बातम्यांमध्ये केलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com