'केटीएम'ची नवीन २५० अ‍ॅडव्हेंचर बाजारात आलीये; कशी बुक कराल?वाचा...

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

या दुचाकीची दिल्ली-एक्स शोरूम किंमत २.४८ लाख रूपये इतकी आहे. ही दुचाकी केटीएम ३९० अॅडव्हेंचरच्या तुलनेत ५६००० हजारांनी स्वस्त आहे.

 

केटीएमने भारतात आपली नवीन दुचाकी २५० अॅडव्हेंचर लॉन्च केली आहे. या दुचाकीची दिल्ली-एक्स शोरूम किंमत २.४८ लाख रूपये इतकी आहे. ही दुचाकी केटीएम ३९० अॅडव्हेंचरच्या तुलनेत ५६००० हजारांनी स्वस्त आहे. दुचाकी आज जरी बाजारात आली असली असली तरी तिची प्री बुकींग कंपनीने मागच्या महिन्यातच सुरू केली होती. बाईक लव्हर या गाडीला जवळच्या केटीएम शोरूम मधून १००० ते ५००० रूपयांचे टोकन देऊन ही दुचाकी बुक करू शकतात.

का विशेष आहे?

केटीएम २५० अॅडव्हेंचरला १४.५ लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे, ज्यात ४०० किमी. पर्यंतची रेंज आहे. यात ऑफ रोड एबीएस फीचर बरोबरच एलसीडी स्क्रीन दिली आहे. याशिवाय यात जीपीएस ब्रॅकेट, रेडिएटर प्रोटेक्शन ग्रिल, क्रैश बंग्स, हेडलँप प्रोटेक्शन, आणि हँडलबारसोबत अनेक आकर्षक फिचर दिले आहेत. 

 या दुचाकीच्या परफॉरमन्सबद्दल बोलायचं झालं तर 248.8 सीसीचे सिंगल-सिलेंडर वाले लिक्विड-कुल्ड इंजिन दिले आहे. या दुचाकीचे  इंजन 9,000 आरपीएमवर 29.5 बीपीची मॅक्सिमम पॉवर आणि 7500 आरपीएमवर 24 एनएमचे पीक टॉर्क जनरेट होते. 

 लांबचा पल्ला आणि कोणत्याही रस्त्यावर राइडिंगच्या अनुभवासाठी या गाडीच्या फ्रंटला ४३ मिलिमीटरचे WP APEX USD फॉर्क्स सस्पेंशन आणि रियर मध्ये मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. या दुचाकीच्या फ्रंट युनिटमध्ये १७० मिलिमीटरचे ट्रॅवल आणि रियर मध्ये १७७ मिलिमीटरचे रिअरशॉक अॅब्जॉर्बर देण्यात आले आहे. फ्रंटला १९ इंच आणि रियरमध्ये १७ इंचचे पायश्व दिले आहे. या गाडीला ड्युयल पर्पजसाठी एमआरएफ टायर्स दिले आहेत.   

संबंधित बातम्या