KV Subramanian: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार नाही

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही, परंतु विकासाची गती आणखी वेगवान करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असेल.

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा(COVID-19) भारतीय अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही, परंतु विकासाची गती आणखी वेगवान करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असेल. साथीच्या आजारामुळे उद्भवणारी परिस्थिती पाहता, चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर दुप्पट किंवा 10 टक्कयांपेक्षा जास्त राहील की नाही, असे मत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रह्मण्यम (KV Subramanian) यांनी व्यक्त केले.(KV Subramanian How will the second wave of corona affected the Indian economy)

यावर्षी जानेवारीत 2020-21 मध्ये प्रसिद्द केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात मार्च 2022 या वित्तीय वर्षात 11 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दुसर्‍या लाटेचा फारसा परिणाम होणार नाही. कोरोनामुळे निर्माण झालेली अनिश्चितता पाहता, वास्तविक  संख्या सांगणे फार अवघड आहे. परंतु आम्हाला असे वाटते की, या लाटेचा अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही, परंतु आपल्याला या गोष्टा विचारात घेवून आरअतिक सर्वेक्षण आणि भारतीय बजेट या दोन्हींचा मेळ साधावा लागेल, असेही ते म्हणाले.

जीडीपी 7.3 टक्क्यांनी घसरण
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आधीच्या तिमाहीमध्ये GDP वाढीचा दर जेर पकडायला लागला आहे. परंतु मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 7.3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यापूर्वी यापेक्षा मोठ्या घसरणीचा अंदाज होता. आर्थिक सर्वेक्षणात 2020-21 या आर्थिक वर्षासाठी जीडीपीमध्ये 8 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तविला गेला होता. कोरोनाच्या दुसरी लाटेने देशात हाहाकार माजवला असल्याने त्याला रोखन्यासाठी स्थानिक व राज्यनिहाय निर्बंधांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धी दर कमी झाला आहे.  त्यामुळे अर्थव्यवस्था पुढे जाण्यासाठी आर्थिक आणि मौद्रीक पाठबळ महत्त्वपूर्ण आहे.

मार्च 2021 पर्यंत अर्थव्यवस्थेची चांगली परिस्थीती
मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले की, मार्च 2021 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा होत होती. पण कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे या आर्थिक सुधारणेला ब्रेक लागला आहे.  सरकारच्या उच्च खर्चाच्या तुलनेत आणि निर्यातीत वाढ झाल्याने गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत जीडीपी विकास दरात घसरण झाली आहे.

मोदी सरकारकडे राज्यांचे 1.58 लाख कोटी थकीत 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता
सुब्रमण्यम म्हणाले की, गेल्या वर्षी पुरवठा आणि मागणीच्या परिणामावरुन अर्थव्यवस्था अजूनही सावरत असल्याने दुसर्‍या लाटेच्या वेगाचा आणि प्रमाणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. लसीकरणाचा वेग गती वाढवण्याचा आणि कोरोना नियमांचं पालन केलं तर तिसऱ्या लाटेपासून आपण सुरक्षित राहू शकतो आणि त्याचा फायदा अर्थव्यस्थेला ही होवू शकतो. असे सांगून त्यांनी योग्य कोरना नियमांच पालन करण्याचा सल्ला दिला आहे. सुब्रमण्यम यांनी महागाईबद्दल सांगितले की महागाई अंदाजित रेंजमध्ये राहील आणि ती निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वाढू  नये. यंदा सामान्य मान्सुन होण्याची शक्यता असल्याने या आर्थिक वर्षात धान्यचे विक्रमी उत्पादन होणे अपेक्षित आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे खिसे असतात नेहमीच खाली

 

संबंधित बातम्या