Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल -डिझेलचे भाव काय? जाणून घ्या आजचे दर

आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel PriceDaink Gomantak

Goa Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या असून ब्रेंट क्रूडचा भाव 81 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमतींमध्येही बदल दिसून येत आहेत.

नोएडामध्ये किमती कमी झाल्या आहेत, तर गुरुग्राममध्ये किमती वाढल्या आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Goa Petrol-Diesel Price
Mukesh Ambani विकणार 50 वर्षे जुने 'हे' खास पेय, कोका-कोला अन् पेप्सीला देणार टक्कर!

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) मध्ये पेट्रोल 19 पैशांनी स्वस्त होऊन 96.60 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 16 पैशांनी घसरून 89.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 6 पैशांनी महागले असून ते 107.30 रुपये प्रतिलिटर झाले आहे. डिझेल 6 पैशांनी वाढले असून 94.26 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोलचा दर 5 पैशांनी वाढून 96.76 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेल 5 पैशांनी वाढून 89.64 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.82

Panjim ₹ 97.82

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.37

Panjim ₹ 90.37

South Goa ₹ 90.29

Goa Petrol-Diesel Price
Farmers Scheme: करोडो शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी, आता 1 रुपयात मिळणार 'हा' फायदा

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com