ऑनलाइन शिक्षणासाठी Lava Z2 Max लाँच; किंमत फक्त... 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने (LAVA)ने मंगळवारी आपला  झेड 2 मॅक्स (Lava Z2 Max)  स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.  स्मार्टफोन लावाने  मोठ्या स्क्रीनसह आणि दमदार बॅटरीबॅकअप देखील दिला आहे.

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने (LAVA)ने मंगळवारी आपला  झेड 2 मॅक्स (Lava Z2 Max)  स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.  स्मार्टफोन लावाने  मोठ्या स्क्रीनसह आणि दमदार बॅटरीबॅकअप देखील दिला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर सर्वच विद्यार्थी घरून onlaaइन शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्याच्या ऑनलाईन शिक्षणाला सपोर्ट करण्यासाठी लावाने कोरोना काळात आपला स्मार्टफोन  लाँच केला आहे.  (Launch of Lava Z2 Max for online learning; Price only ...) 

रूग्णालयात दोन लाख भरताय तर मग द्यावं लागेल ओळखपत्र

लाव्हा इंटरनॅशनलचे प्रॉडक्ट हेड तेजिंदर सिंग यांनी  दिलेल्या याबाबत एक निवेदन जारी केले आहे. कोरोना काळात प्रत्येक विद्यार्थ्याला   “LAVA Z2 Max च्या सहाय्याने  योग्य शिक्षण मिळावे आणि  देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी, आम्ही प्रयत्न करीत आहोत.” असे तेजिंदर सिंग यांनी म्हटले आहे. 

आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बदलता येणार बँक ब्रांच; अशी आहे प्रक्रिया

लावा झेड 2 मॅक्स मध्ये 7 इंचांचा एचडी + डिस्प्ले आणि 6000 एमएएच बॅटरी आहे. लावा झेड 2 मॅक्स मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप असून त्यात 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. तर  हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ प्रोसेसरवर चालतो.  फोनमध्ये फास्ट आणि स्पष्ट ऑडिओचे इनबिल्ट बॉक्स स्पीकर्स आहेत.  त्याचबरोबर  2 जीबी डीडीआर 4 एक्स रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.  ग्राहक हा फोन कंपनीच्या ई-स्टोअरवर आणि प्रमुख ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून  7,799 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.   

डिजिटल शिक्षणासह ऑनलाईन कामे करण्यासाठी या स्मार्टफोनचा वापर करता यावा यासाठी लावा कंपनीच्या समूहाने उत्पादनावर बरंच विचार-मंथन करून वेगळ्या पद्धतीने हा फोन डिझाईन केला. लावा झेड 2 मॅक्स स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉइडने इनहॅन्स्ड केला आहे. लावा झेड 2 मॅक्स स्मार्टफोन  3 तास 47 मिनिटांत  चार्ज होतो. यानंतर आपल्याला संपूर्ण ब्राइटनेस आणि मोठ्या आवाजात  9 तास 8 मिनिटांचा YouTube व्हिडिओ प्लेबॅक वेळ मिळेल. हा फोन 174.7 × 786 × 9.05 मिमी आहे आणि वजन 216 ग्रॅम आहे.

संबंधित बातम्या