EPFO सदस्यांचे नॉमिनी बदलण्याची जाणून घ्या प्रक्रिया

ईपीएफओने (EPFO) पीएफ ग्राहकांना नॉमिनी (Nominee) बलण्याचा अधिकार दिला आहे
EPFO सदस्यांचे नॉमिनी बदलण्याची जाणून घ्या प्रक्रिया
Learn the process of changing the nominee of EPFO Dainik Gomantak

ईपीएफओने (EPFO) पीएफ ग्राहकांना नॉमिनी (Nominee) बलण्याचा अधिकार दिला आहे. पीएफ (PF) सदस्यांना यासाठी नियोक्त्याची एनओसी (NOC) घेण्याची गरज नाही. हे सदस्य स्वत:त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील त्यांच्या PF खात्यावर फोटोसह (Photo) अपलोड करू शकतील. या अधिकारामुळे पीएफ (PF Member) सदस्यांच्या अकाली मृत्यूमुळे नॉमिनी (Nominee) असलेल्या व्यक्तीला चिंता करायची गरज नाही. सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र ( Certificate) जोडल्यास अंतिम थकबाकीची प्रक्रिया सुरू होईल.

ईपीएफओने सर्व प्रादेशिक भविष्य निधी कार्यालयाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने सर्व ऑनलाइन करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 9-10 सप्टेंबर रोजी प्रादेशिक भविष्य निधी कार्यालय पीएफ सदस्यांना जागरूक करण्यासाठी मोहीम देखील राबवणार. ईपीएफओ मुख्यालयाचे प्रादेशिक पीएफ आयुक्त उत्तम प्रकाश ई-नॉमिनेशन शंभर टक्के करण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे. ज्या तीन कार्यालयामध्ये 100 टक्के लक्ष्य पूर्ण केले जाईल, त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. प्रमानपत्रासह ईपीएफओ सदस्यांना ऑनलाइन प्रक्रियेची लिंकसुद्धा दिली आहे.

Learn the process of changing the nominee of EPFO
Startup साठी स्वित्झर्लंड बनतयं भारतीयांच्या आकर्षणाचे केंद्र

ईपीएफओ उत्तरप्रदेशचे सदस्य सुखदेव प्रसाद मिश्रा यांनीस सांगितले की शंभर टक्के पिएफ खात्यांमध्ये नॉमीनीस व्यक्तींचा तपशील भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आतापर्यंत, सदस्य नियोक्ताकडे जात होते आणि कुटुंबातील सदस्य आणि नॉमिनी व्यक्तींची माहिती नोंदवत होते. हे त्यांना अनेक दिवसांपासून घेत आहे. EPFO ने आपले खाते सदस्यांना बदलण्याचा अधिकार दिला आहे. सदस्य नॉमिनीमध्ये बदल करू शकतो. यासाठी सदस्याला नियोक्ता किंवा एचआयाकडे जाण्याची गरज नाही. पण ज्यांचे आधार कार्ड पीएफ खात्याच्या युएएनसह अपलोड केले असेल त्यांना नॉमिनी बदलण्याचा अधिकार दिला आहे.

Learn the process of changing the nominee of EPFO
Job Openings: देशात 50 लाख लोकांना मिळणार रोजगार, SBI चा अंदाज

* प्रक्रिया

* नॉमिनी व्यक्तीला त्याच्या पीएफ खात्याशी जोडण्यासाठी सदस्याला 3.5सेमी -4.5 सेमी फोटो द्यावा लागणार

* नॉमिनीचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, पत्ता, IFSC कोड पहिलेच स्कॅन करून फाइल तयार करावी.

* अशा प्रकारे नॉमिनेशन करावे

* पीएफ सदस्याला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करून सेवा सर्विस पेजवर जावे.

* येथे तुम्हाला मेंबर पेजवर क्लिक करावे लागेल आणि UAN आणि पासवॉर्ड टाकावे लागेल.

* यानंतर, पीएफ सदस्याला पीफ सदस्याला प्रक्रिया सुरू करण्यासाठी ई- नॉमीनेशनच्या मैनेज टॅबवर क्लिक करावे.

* नंतर सेव्हवर क्लिक केल्यावर अॅड फॅमिली डिटेलवर क्लिक करावे.

* यानंतर, तुम्हाला तुमच्या नॉमिनेशन डिटेल ब्लॉकवरील सर्व माहिती भरावी लागेल.

* ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ई- साईन तयार करण्यासाठी त्यावर क्लिक करावे.

* येथे ई-साईन तयार होताच, सदस्यांच्या मोबाइलवर ओटीपी क्रमांक पाठवण्यात येईल.

* ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करावे.

टिप: तुम्हाला मिळालेला OTP कोणसोबतसुद्धा शेअर करू नका.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com