LIC Jeevan Azad: LIC ची 'ही' नवी पॉलिसी देते गॅरंटी परतावा, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि फायदे

मर्यादित मुदतीची प्रीमियम भरणारी ही योजना आहे.
LIC Jeevan Azad
LIC Jeevan AzadDainik Gomantak

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने जीवन आझाद (प्लॅन क्र. 188) ही पॉलिसी लाँच केली आहे, हमी परतावा देणारी ही विमा योजना आहे. मर्यादित मुदतीची प्रीमियम भरणारी ही योजना आहे.

पॉलिसी मुदतीदरम्यान विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्याची यात तरदूत आहे. एलआयसी पॉलिसीधारक मुदतपूर्तीच्या कालावधीपर्यंत जिवंत राहिल्यास ही योजना हमी विमा रकमेची देखील हमी देते.

LIC Jeevan Azad
SBI-PNB-BoB सह सरकारी बँकांबाबत मोठी घोषणा, तुमचेही खाते असेल तर...

पॉलिसीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, LIC जीवन आझाद अंतर्गत किमान मूळ विम्याची रक्कम 2 लाख रुपये आहे, तर कमाल मूळ विम्याची रक्कम 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतच्या विमा रकमेसाठी कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही. तर त्यापेक्षा जास्त विम्याच्या रकमेवर वैद्यकीय तपासणी आवश्यक असेल.

पॉलिसीधारक LIC जीवन आझाद योजना किमान 15 वर्षे आणि कमाल 20 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी केली जाऊ शकते. याशिवाय, ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान वय 90 दिवस आणि कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे.

LIC Jeevan Azad
Indian Railways: वंदे भारत ट्रेनबाबत खूशखबर, आता तिकीट होणार स्वस्त; रेल्वेने बनवली खास योजना

नवीन LIC योजना पॉलिसीधारकाला वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक अंतराने नियमितपणे प्रीमियम भरण्याची सुविधा आहे. LIC जीवन आनंद पॉलिसी खरेदी करताना, पॉलिसीधारकाकडे प्रीमियम पेमेंट मोड आणि कालावधी निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदतीपर्यंत टिकून राहिल्यास, त्याला मॅच्युरिटीवर हमी विमा रक्कम मिळेल जी मूळ विमा रकमेइतकी असेल. याचा अर्थ असा की परिपक्वतेवर पॉलिसीधारकाला विमा रक्कम (किमान रु. 2 लाख आणि कमाल रु. 5 लाख) मिळेल.

पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, मृत्यूवरील विमा रक्कम नॉमिनीला दिली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com