LIC Scheme: निवृत्तीनंतर पैशाची चिंता नाही! LIC ने आणली आलिशान पॉलिसी, जाणून घ्या

LIC New Jeevan Shanti Policy: तुम्हाला तुमचे म्हातारपण सुरक्षित ठेवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.
Money
MoneyDainik Gomantak

LIC New Jeevan Shanti Policy: तुम्हाला तुमचे म्हातारपण सुरक्षित ठेवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. LIC ने तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही वृद्धापकाळाचा खर्च सहज सांभाळू शकता. LIC ने एक नवीन आणि आलिशान पॉलिसी जीवन शांती पॉलिसी लाँच केली आहे. एकदा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली की, तुम्हाला आजीवन हमीसह पेन्शन मिळेल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचा खर्च ( LIC Life Insurance) सहज भागवू शकता.

जाणून घ्या काय आहे योजना? (LIC Jeevan Shanti Yojana)

जीवन शांती पॉलिसी एलआयसीच्या (LIC) जुन्या प्लॅन जीवन अक्षय योजनेसारखीच आहे. तुमच्याकडे जीवन शांती पॉलिसीमध्ये दोन पर्याय आहेत. पहिला इमीडिएट अ‍ॅन्युइटी आणि दुसरा डेफ्फर्ड अ‍ॅन्युइटी. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. पहिल्या म्हणजेच इमीडिएट अ‍ॅन्युइटी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शनची सुविधा उपलब्ध होते. दुसरीकडे, डिफर्ड अ‍ॅन्युइटीच्या पर्यायामध्ये, पॉलिसी घेतल्यानंतर 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनी पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमची पेन्शन लगेच सुरु करु शकता.

Money
Goa LIC फायनान्सच्या मालमत्तांची किंमत दुप्पट घेऊन एकाची फसवणूक

किती पेन्शन मिळेल

या योजनेंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित केलेली नाही. तुमची गुंतवणूक, वय आणि डिफरमेंट कालावधीनुसार तुम्हाला तुमचे पेन्शन मिळेल. गुंतवणूक (Investment) आणि पेन्शन सुरु होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल किंवा वय जितके जास्त असेल तितके तुम्हाला पेन्शन मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार LIC पेन्शन देते.

Money
LIC Jeevan Umang Policy: LIC ग्राहकांसाठी मोठी बातमी, वर्षाला मिळणार 36 हजार रुपये!

कोणाला लाभ मिळेल (How Much Pension Will Be Received)

LIC ची ही योजना किमान 30 वर्षे आणि कमाल 85 वर्षे वयाच्या व्यक्ती घेऊ शकतात. याशिवाय, जीवन शांती योजनेतील कर्ज (loan) पेन्शन सुरु झाल्यानंतर 1 वर्षानंतर करता येते आणि पेन्शन सुरु झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर ते सरेंडर केले जाऊ शकते. दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेताना वार्षिक दरांची हमी दिली जाईल. प्लॅन अंतर्गत विविध अ‍ॅन्युइटी पर्याय आणि अ‍ॅन्युइटी पेमेंटच्या पद्धती उपलब्ध आहेत. परंतु ही पॉलिसी घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की, एकदा निवडलेला पर्याय बदलता येणार नाही. हा प्लॅन ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com