LIC Policy Scheme: LIC च्या या 3 योजना देतायेत बंपर रिटर्न, जाणून घ्या

LIC Policy Scheme: एलआयसीची खासियत म्हणजे उत्तम परताव्यासह तुमचे पैसेही सुरक्षित राहतात.
LIC
LICDainik Gomantak

LIC Policy Scheme: बर्‍याच वेळा नोकरदार लोक आपले पैसे कुठे गुंतवायचे याबद्दल खूप गोंधळलेले असतात… आज आम्ही तुम्हाला LIC च्या 3 खास योजना सांगणार आहोत, जिथे तुम्ही पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकता. एलआयसीची खासियत म्हणजे उत्तम परताव्यासह तुमचे पैसेही सुरक्षित राहतात.

1. LIC Jeevan Umang Plan

LIC द्वारे ग्राहकांना जीवन उमंग पॉलिसीची सुविधा देखील दिली जाते, ज्याद्वारे तुम्ही तुमचा वृद्धापकाळ सुरक्षित करु शकता. ही एक प्रकारची एंडोमेंट योजना आहे, ज्यामध्ये 3 महिने ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे, तुम्हाला 100 वर्षांपर्यंत कव्हरेज मिळते. तुम्ही वयाच्या 26 व्या वर्षी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेतल्यास तुम्हाला वार्षिक योजनेच्या रकमेच्या 8% रक्कम मिळेल. त्यासाठी, तुम्हाला 30 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल, त्यानंतर 31 व्या वर्षापासून तुम्हाला 36000 रुपये मिळू लागतील.

LIC
LIC Policy वर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या, अर्जाची ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया

2. LIC Tech Term Plan

LIC द्वारे ग्राहकांना (Customers) टेक टर्म प्लॅनची ​​सुविधा देखील दिली जाते. ही एक जोखीम प्रीमियम योजना आहे, जी तुम्ही 18 वर्षे ते 65 वर्षे वयापर्यंत खरेदी करु शकता. या योजनेच्या कव्हरेजसाठी कमाल वयोमर्यादा 80 वर्षे ठेवण्यात आली आहे. तुम्ही ही योजना 10 वर्षे ते 40 वर्षांपर्यंत खरेदी करु शकता.

LIC
LIC Yojana: LIC च्या या सुपरहिट योजनेत जमा करा पैसे, मिळेल 50,000 रुपये पेन्शन

3. LIC Jeevan Labh Policy

याशिवाय LIC ग्राहकांना जीवन लाभ पॉलिसी देखील प्रदान करते. यामध्ये किमान 2 लाख रुपयांची गुंतवणूक (Investment) करणे आवश्यक आहे, तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय तुम्हाला टॅक्स बेनिफिट आणि डेथ बेनिफिटची सुविधाही मिळते. तुम्ही ही योजना 16 ते 25 वर्षांपर्यंत घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com