पॅन आधारशी लिंक केला का? नसेल तर, आधी ही बातमी वाचा 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

जर आपण आपला पॅन अजूनही आधारशी लिंक केला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे आता तुमच्याकडे फक्त एकच दिवस शिल्लक आहे.

जर आपण आपला पॅन अजूनही आधारशी लिंक केला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे आता तुमच्याकडे फक्त एकच दिवस शिल्लक आहे. 31 मार्च 2021 पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत पॅन नंबर आधारशी लिंक केला नाही तर आपले पॅन कार्ड पुढील महिन्यापासून निष्क्रिय होईल. इतकेच नाही तर 31 मार्चनंतर पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला दंड म्हणून 1000 रुपये द्यावे लागतील. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने लोकसभेत वित्त विधेयक 2020 मंजूर केले. यात नवीन कलम 234Hचा  समावेश करण्यात आला आहे.  ज्या अंतर्गत आपला पॅन आधारशी जोडण्यात उशीर झाल्यास उशीरा शुल्क एक हजार रुपयांपर्यंत भरावे लागणार आहे. 

परिवर्तनासाठी ममता बॅनर्जींना पराभूत करा : अमित शहा

त्याचबरोबर, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) देखील अनेकदा पॅनकार्डधारकांकडून आधार लिंक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, यापुढे पॅन-आधार जोडण्यासाठी अंतिम मुदत वाढविली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. आपण वेळेपूर्वी पॅन-आधार लिंक न केल्यास दोन मोठे तोटे तुम्हाला होऊ शकतात. पहिला म्हणजे, पॅन आधारशी लिंक नसेल तर 1 एप्रिल 2021 नंतर आपले पॅन कार्ड अवैध होईल आणि दूसरा तोटा म्हणजे  31 मार्च नंतर पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये उशीरा फी म्हणून द्यावे लागतील.  त्यामुळे आयटीआर दाखल करण्यापासून बँकेच्या केवायसी पर्यंत कोणतेही काम करण्यासाठी तुम्हाला पॅन किंवा आधार ची आवश्यकता असते. त्यामुळे 31 मार्च पूर्वी पॅन आधारशी लिंक करणे अत्यंत अनिवार्य झाले  आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर होणार बायपास शस्त्रक्रिया 

आजच्या घडीला पॅन कार्ड प्रत्येक आर्थिक कामासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. पॅनकार्ड देखील बँक खाते उघडण्यासाठी आणि म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी  आवश्यक आहे. याशिवाय ,50 हजारायवरील रुपयांच्या वरच्या व्यवहारांसाठी पॅनकार्डही आवश्यकत भासते. त्यामुळे पॅन आधारशी लिंक करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.  

   पॅन-आधारशी  लिंक करण्यासाठी 

सर्व प्रथम, आपण आयकर वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जा. 

- येथे डाव्या बाजूला तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल.

- यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्याच्या वर क्लिक करा येथे लाल रंगात लिहिले    जाईल.

- जर आपण आधीपासूनच आपला पॅन आणि आधार लिंक केला असेल तर त्यावर       

- क्लिक करून त्याचे स्टेट्स व्हेरिफाई करू शकता. 

- जर पॅन आधारशी लिंक केले नसेल तर खालील बॉक्समध्ये क्लिक करा, पॅन, आधार क्रमांक, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा एंटर करा. 

- यानंतर लिंक आधार'वर क्लिक करा. यानंतर पॅन आधारसही लिंक होण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

- तसेच, 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवून आपण पॅन ते आधार लिंकच्या स्थितीविषयी माहिती मिळवू शकता. 

- जर आपल्याला त्या उदाहरणावरून समजले असेल तर यूआयडीपीएन <स्पेस> <12 अंकी आधार क्रमांक> <स्पेस> <10 अंकी पॅन नंबर> एसएमएसद्वारे टाइप करा. 

संबंधित बातम्या