टाळेबंदीमुळे वडापाव व्यावसायिकांवर गदा

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

टाळेबंदीमुळे वडापाव, मिरचीपाव, भेळपूरी, ऑम्लेट पाव, रसा ऑम्लेटची फिरत्या व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने रोजच्या कमाईवर संकट आले आहे.

फोंडा, 

टाळेबंदीच्या काळापासून फोंडा शहरातील वडापाव व्यावसायिकांवर गदा आल्याने
वडापाव व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून पारंपरिक चालू असलेला हा व्यवसाय कधी सुरू होईल. याकडे व्यवसायकांचे लक्ष लागून राहिले आहे.
टाळेबंदीमुळे वडापाव, मिरचीपाव, भेळपूरी, ऑम्लेट पाव, रसा ऑम्लेटची फिरत्या व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने रोजच्या कमाईवर संकट आले आहे. फोंडा शहरांच्या रस्त्याकडेला थांबून आपला व्यवसाय चालवत होते. या व्यवसायावर कित्येक व्यावसायिक विसंबून होते. त्यामुळे त्याची रोजची रोजीरोटी मिळवत होते. यात परप्रांतीय फिरत्या व्यावसायिकांचा व्यवसायच चालवत होता. सध्या देशात टाळेबंदी चालूच असल्याने काही परप्रांतीय व्यावसायिक स्थलांतरित झाले आहेत. काम सुटल्यानंतर कित्येक लोक वडापाव खाण्याची मजा लुटत होते. फोंडा शहर व जवळपासच्या क्षेत्रात रात्री उशिरापर्यंत राहून हा वडापावच इतर व्यवसाय करीत होते.
वडापाव खाणाऱ्याची सवय पडल्याने वडापाव खाल्याशिवाय राहता येत नव्हते. सध्या टाळेबंदीच्या काळापासून वडापाव व इतर व्यवसाय डबघाईला आला आहे.

संबंधित बातम्या