Credit Card हरवलंय? मग आरबीआयच्या नियमानुसार त्वरीत करा या गोष्टी

RBI Rules For Credit Card : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड हरवल्यास ते ब्लॉक करण्याचा नियम तयार केला आहे.
RBI Rules For Credit Card
RBI Rules For Credit CardDainik Gomantak

आजच्या काळात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. आजकाल लोक रोख पैशांनी व्यवहार करण्याऐवजी क्रेडिट कार्ड वापरण्यास प्राधान्य देतात. पण, हे कार्ड कुठेतरी हरवल्यास आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो. यासोबतच कार्ड चुकीच्या हातात पडल्यास आपले मोठे नुकसानही होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड हरवल्यास ते ब्लॉक करण्याचा नियम तयार केला आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, जर क्रेडिट कार्ड हरवल्यास ते लवकरात लवकर ब्लॉक केले पाहिजे. यासाठी आपल्याला शेवटच्या क्रेडिट कार्ड व्यवहाराचा तपशील द्यावा लागेल. तसेच कार्ड चोरी किंवा हरवल्याची माहिती सदर बँकेला द्यावी लागेल. (Lost Credit Card Then quickly do these things as per RBI rules)

RBI Rules For Credit Card
UPI Server Down : ऑनलाईन आर्थिक व्यवहारात बाधा; युजर्स हैराण

मोबाइल अॅपवरून ब्लॉक करा कार्ड

देशातील अनेक बँका जसे की SBI आणि पंजाब नॅशनल बँक त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईल अॅप्स SBI YONO आणि PNB One या अॅपद्वारे कार्ड ब्लॉक करण्याची परवानगी देतात. याशिवाय इतर बँकाही ग्राहकांना ही सुविधा देतात. त्याच वेळी, तुम्ही मोबाइल अॅपऐवजी कस्टमर केअरला कॉल करून क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकता. परंतु, लक्षात ठेवा की बँकेचा ग्राहक सेवा क्रमांक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच घेतला पाहिजे. (RBI Rules For Credit Card)

जर तुमचे क्रेडिट कार्ड हरवले असेल तर ते लवकरात लवकर ब्लॉक करा. त्यानंतर तुम्हाला त्या बँक खात्यावर दुसरे कार्ड मिळू शकते. बँक ग्राहकाला डुप्लिकेट क्रेडिट कार्ड जारी करते. नवीन कार्डसाठी अर्ज करताना, तुमचा विद्यमान पत्ता बदलला असल्यास, तुमच्या अर्जामध्ये नवीन पत्ता नमूद करा. अन्यथा ते जुन्या पत्त्यावरच पाठवले केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com