LPG Cylinder चा पुन्हा भडका, सर्वसामान्यांचे वांदे

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची (LPG Cylinder) किंमत प्रति सिलिंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
LPG Cylinder चा पुन्हा भडका, सर्वसामान्यांचे वांदे
LPG Cylinder gas price hikedDainik Gomantak

सर्वसामन्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी महागाईचा मोठा धक्का बसला आहे.सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमती पुन्हा वाढवल्या आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढवली आहे. यानंतर, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1693 रुपयांवरून 1736.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी झाली आहे.(LPG Cylinder gas price hiked)

LPG Cylinder gas price hiked
क्रिप्टोकरन्सी तेजीत, बिटकॉइनही 33 लाखांच्या पार

तथापि, तेल कंपन्यांनी 14.2 किलो विनाअनुदानित घर वपरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत नाहीत.त्यांच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपये आहे. गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती.

सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्वाधिक वाढ दिल्लीत 43.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 43.5 रुपयांनी वाढून 1736.5 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 35 रुपयांनी वाढून 1805.5 रुपये झाली. मुंबईत किंमत 35.5 रुपयांनी वाढून 1685 रुपये आणि चेन्नईमध्ये 36.5 ते 1867.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी झाली आहे .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com