सर्वसामान्यांना झटका! नवीन एलपीजी कनेक्शनही झाले महाग

LPG Gas Connection: आता नवीन किचन कनेक्शन घेतल्यावर 750 रुपये अधिक जमा करावे लागणार आहेत.
Goa Free LPG Cylinder
Goa Free LPG CylinderDainik Gomantak

घरगुती एलपीजी गॅस आधीच महाग आहे. आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणे देखील महाग झाले आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी उद्यापासून म्हणजेच गुरुवार, 16 जूनपासून घरगुती गॅस कनेक्शन महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजी कनेक्शन अंतर्गत, कंपन्यांनी 14.2 किलो सिलेंडरची सुरक्षा रक्कम 750 रुपयांनी वाढवली आहे. पाच किलोच्या सिलेंडरसाठी 350 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. केवळ एलपीजी सिलेंडरच नाही तर पेट्रोलियम कंपन्यांनीही गॅस रेग्युलेटरच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन गॅस रेग्युलेटरसाठी आणखी 100 रुपये मोजावे लागतील.

आता नवीन किचन कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 2,200 रुपये द्यावे लागतील . तर यापूर्वी 1450 रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच आता सिलिंडरची सिक्योरिटी म्हणून 750 रुपये अधिक जमा करावे लागणार आहेत. याशिवाय रेग्युलेटरसाठी 250, पासबुकसाठी 25 आणि पाईपसाठी 150 रुपये वेगळे द्यावे लागतील. त्यानुसार, पहिल्यांदा गॅस सिलिंडर कनेक्शन आणि पहिल्या सिलिंडरसाठी ग्राहकाला एकूण 3,690 रुपये मोजावे लागणार आहेत. जर ग्राहकाने दोन सिलिंडर घेतले तर त्याला सुरक्षा म्हणून 4400 रुपये द्यावे लागतील.

Goa Free LPG Cylinder
5G नेटर्वकचा मिळणार लाभ, सरकारने दिली 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका

पाच किलोच्या सिलेंडरच्या सिक्योरिटीसाठी अधिक रक्कम जमा करावी लागणार आहे. पाच किलोच्या सिलेंडरच्या सुरक्षेसाठी आता 800 रुपयांऐवजी 1150 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांनाही धक्का बसणार आहे. जर या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केला, म्हणजे दुसरा सिलिंडर घेतला, तर त्यांना वाढीव सिक्योरिटी रक्कम भरावी लागेल. नवीन कनेक्शन रेग्युलेटरसाठी ग्राहकांना आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये खर्च करावे लागतील.

एका सिलिंडरच्या कनेक्शनची नवीन किंमत आता 3690 रुपये असेल. गॅस स्टोव्हचे पैसे वेगळे द्यावे लागतील. पण घरगुती गॅस कनेक्शनच्या खर्चामुळे सर्वसामान्यांना धक्का बसणार आहे. एलपीजीच्या वाढत्या किमतींमध्ये कनेक्शनच्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com